रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2025 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neha Kakkar Attends Driver Wedding 

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

Neha Kakkar Attends Driver Wedding  : नुकत्याच झालेल्या मेलबर्न मैफिलीच्या वादानंतर गायक नेहा कक्कर तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यासमवेत तिच्या ड्रायव्हरच्या लग्नात हजेरी लावताना दिसली. या लग्नात नेहा आणि रोहनप्रीतने खूप धमाल केली. लग्नातील समोर आलेल्या फोटो, व्हिडीओमुळे ते दोघेही चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी ती केवळ पाहुण्यांनाच भेटली नाही तर वधू -वरांचे अभिनंदन करताना दिसली. शिवाय या लग्नात नेहाने चाहत्यांनाही वेळ दिला. नेहा चाहत्यांसह सेल्फी घेतानाही दिसली. सध्या या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहेत. नेहा कक्करला पाहून सर्व पाहुणे आनंदित झाले आणि तिला भेटण्यासाठी, तिच्याबरोबर सेल्फीसाठी धडपड करताना दिसले. त्यानंतर नेहा रोहनप्रीतसह स्टेजवर पोहोचली आणि वधू -वरांचे तिने अभिनंदन केले. यावेळी नेहाने वधूला जवळ घेतले त्यानंतर तिने खाली वाकून तिच्या पायाला स्पर्श केला. हे पाहून नेहाने ताबडतोब तिला उचलले आणि तिला मिठी मारली. नेहा कक्करचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तिचे भरभरुन कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, ‘काहीही म्हणा, पण माणूस म्हणून ही खूप चांगली आहे”. तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “हे जोडपे किती प्रेमळ आहे”. तर दुसर्‍याने लिहिले, “तुम्ही कितीही ट्रोल केले तरी ते खरोखर चांगले आहेत”. आतर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “प्रत्येक सेलिब्रिटी अशीच असावी, जी आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घेते”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

या कौतूकामध्ये काही नेटकऱ्यांनी नेहाला तिच्या कपड्यांवरुन टोकले आहे. “असे कपडे घालून लग्नात कोण जाते?”, असं म्हटलं आहे. तर काहीजण म्हणाले की, “नुकत्याच मेलबर्न मैफिलीत झालेल्या वादानंतर नेहा कक्कर हे सर्व प्रसिद्धी आणि प्रतिमा सुधारण्यासाठी करीत आहे”. यावेळी भाऊ टोनी कक्कर आणि आई यांच्यासमवेत नेहा कक्कर या लग्नाला उपस्थित होते. स्टेजवर पोहोचताना प्रत्येकाने वधू -वरांना आशीर्वाद दिला आणि अभिनंदन केले.

Tags: bollywood singerneha kakkar and rohanpreet singhNeha Kakkar Attends Driver Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Pakistani Person Viral Video

"त्यांना न्याय मिळाला", पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.