‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, मॅरेज बिरो वाल्यांनी चुकीची स्थळ आणल्यामुळे अहिल्यादेवींचा संताप होतो आणि अहिल्यादेवी त्यांना परत जायला सांगतात आणि जाताना असं सांगतात की, माझ्या आदित्यसाठी सुशिक्षित आणि विश्वासातली मुलगी हवी आहे त्यामुळे तुम्ही इथून गेलात तरी चालेल. तर पारू सांगते यात माझी काहीच चूक नाही यावर अहिल्यादेवी हो मला माहित आहे असं सांगून तिथून निघून जातात. त्यानंतर दामिनी पारूचा खाली पडलेला फोटो उचलते आणि त्याचे तुकडे करुन तिच्या तोंडावर फेकते. त्यामुळे पारूला खूपच वाईट वाटलेलं असतं. (Paaru serial Update)
तर गणी पारूला बोलवायला येतो तर इकडे हरीश पारुला भेटायला आलेला असतो तेव्हा हरीश पारूची माफी मागतो आणि सांगतो की, त्या वेळेला मी तुझ्याबरोबर असायला हवा होतो. तुला मी एकटीला टाकायला नाही पाहिजे होतं पण हे सर्व कोणी घडवून आणलं याचा मी लवकरात लवकर शोध घेईन तर पारू सुद्धा त्यावेळेला नर्वस फील करत असते. त्यानंतर पारू सांगते की, ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या होतातच. त्यानंतर तिथून हरीश निघून जातो तेव्हा पारू म्हणते की, माझं आदित्य सरांबरोबरच लग्न झालं आहे आणि तेच माझे पती आहेत हे मी मान्य केलं आहे. त्यामुळे मी आता दुसऱ्या कोणाचा विचारही करु शकत नाही आणि असं म्हणत, साखरपुड्याची अंगठी तरी हातात का ठेवायची म्हणून ती अंगठी काढून ठेवते पण नंतर तिच्या लक्षात येते की, साखरपुड्याची अंगठी कुठे आहे असं कोणी विचारलं तर काय उत्तर देणार म्हणून ती अंगठी घातलेल्या बोटाला सुरीने कापून घेते आणि तिथे बँडेज लावते.
जेणेकरुन अंगठी तिला घालता येणार नाही. त्यानंतर इकडे दिशा बऱ्याच दिवसांनी घरी परतलेली असते आणि दामिनीने तिला सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा दिशा आदित्यच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की, तुमचं शूट खूप चांगलं झालं तू खरं तर मॉडलिंग करायला हवं. मी तुझं शूट पाहिले आहे असं म्हणते. हे ऐकल्यावर आदित्यला धक्काच बसतो. दिशा म्हणते की, हरीश तिथे का नव्हता. यावर आदित्य थोडासा गोंधळतो त्यानंतर दिशा सांगते की, तुम्ही हे सगळं सासू मॉमला सांगितलं आहे ना?, यावर आदित्य नाही असं सांगतो. त्यावर दिशा म्हणते की, ठीक आहे तुझं सिक्रेट हे माझं सिक्रेट असं म्हणून तिथून निघून जाते त्यानंतर ती अहिल्यादेवींना भेटते तेव्हा अहिल्या देवींची मीटिंग सुरू व्हायला काहीसा वेळ असतो. तेव्हा ती सांगते की, आपण हरीश आणि पारूच्या लग्नाचे शूट पाहूया. मला सुद्धा पाहायला मिळालं नाही आहे त्यावर अहिल्यादेवी होकार देतात.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! वरुण धवन व नताशा दलाल झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये जोरदार सेलिब्रेशन
तितक्यात तिथे आदित्य आणि प्रीतम येतात तेव्हा त्यांना अहिल्यादेवी सांगतात की, आम्ही आता पारू आणि हरीशच्या लग्नाचं शूटच पाहत आहोत, तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन व्हा. हे ऐकल्यावर आदित्य आणि प्रीतमच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तर चहा द्यायला पारू आलेली असते तिलाही दामिनी तिथे थांबायला सांगते. तेव्हा आदित्य असा विचार करतो की, हे अशा पद्धतीने आईसमोर मी पारूबरोबर लग्नाला बसलेलो हे सत्य आलं नाही पाहिजे. आता अहिल्यादेवी खरंच ते शूट पाहणार का?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.