शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साक्षीने डाव पलटवला, प्रेस कॉन्फरन्स घेत अर्जुन-चैतन्यला शिकवला धडा, दोघांनाही बसलाय जबर धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2024 | 10:44 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीने डाव पलटवला, प्रेस कॉन्फरन्स घेत अर्जुन-चैतन्यला शिकवला धडा, दोघांनाही बसलाय जबर धक्का

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अर्जुन पूर्णा आई व रविराज यांना समजावल्याबद्दल आणि एकूणच परिस्थिती अगदी उत्तम हाताळल्याबद्दल सायलीचे आभार व्यक्त करते. तू पुढे ज्या कुणाशी लग्न करशील त्यांना पण आनंदी ठेवशील असंही अर्जून सायलीला सांगतो. त्यावर सायली मी इतर कुणाशी लग्न न करता सुभेदारांचीच सून होण्याचे मनातल्या मनात म्हणते. इतक्यात प्रतिमाच्या फोटोजवळची फुलं अर्जुन-सायलीजवळ पडतात. दुसरीकडे नागराज व तन्वी प्रतिमा, सायली या विषयाला प्रचंड कंटाळतात. (Tharal Tar Mag Serial Update)

नागराज तन्वीला म्हणजेच प्रियावर न चिडता प्रतिमा प्रकरण दोघांनी संपवल्यामुळे सेलिब्रेट करायचं सांगतो. नागराज निघून जाताच तन्वी प्रतिमाचा असुरी आनंद हसून व्यक्त करते. रात्री उशिरा तन्वी म्हणजेच प्रियाला नर्सचा दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी फोन येतो. तन्वी नर्सला फेक रिपोर्टचे इतके पैसे कसे झाले असं विचारते. सायली तिच्या खोलीबाहेरुन जात असताना हे बोलणं ऐकते. दुसऱ्या दिवशी रविराज व सगळ्यांसमोर प्रियाला रात्रीच्या आलेल्या फोनबद्दल सायली विचारणा करते, इतकंच नाही तर प्रिया काय बोलली हे प्रत्येक वाक्य सायली सांगते. त्यावर प्रिया साफ नकार देते आणि अस्मितासुद्धा तिचीच बाजू घेते. अखेर प्रिया स्वतःला लो शुगरचा त्रास जाणवल्याने आणि तुम्हाला ते कळू नये यासाठी नॉर्मल रिपोर्ट बनवायला सांगितल्याचे रविराजला खोटं सांगते. त्यावर पूर्णा आईसुद्धा असं कशाला करायचं असं तिला समजावते. नागराज मात्र प्रियाची बाजू सावरायचा प्रयत्न करतो. तरीही सायलीला मात्र आदल्या रात्रीबद्दल प्रियाचा संशय येतोच. पूर्णा आईला अर्जुन घरी जाण्याबद्दल विचारताच पूर्णा आई माझ्या प्रतिमाच्या घरातून पाय निघत नसल्याचे सांगते.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना मान्य असणार का पारू-आदित्यचं नातं?, गुरुजींनी केलेलं भाकीत ठरणार का खरं?, मालिकेत नवा ट्विस्ट

प्रिया लगेच प्रतिमाबद्दल रडून नाटक करुन दाखवते. इतक्यात सायली फुलं घेऊन प्रतिमाच्या फोटोपाशी येऊन प्रतिमाशी बोलू लागते आणि रविराज तसेच पूर्णा आईशी काहीतरी बोलायचं असल्याचं पण सांगते. पूर्णा आई आणि रविराज यांना तुमच्या चेहऱ्यावर प्रतिमाला कायम हसू बघायचं आहे, असं सायली सांगते. इतक्यात प्रतिमापुढचा दिवा जातो आणि फुलंसुद्धा पडतात. त्यावरुन रविराज पूर्णाआईला जे सायली सांगते तेच प्रतिमाचं म्हणणं असल्याचं सांगतो. सायली व अर्जुन पूर्णा आईला घेऊन रविराजच्या घरून निघतात. इथे अश्विन व कल्पनाला साक्षीची प्रेस कॉन्फरेन्स पाहून धक्का बसतो.

आणखी वाचा – अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीची नवीन खेळी

मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन- चैतन्य व सायली यांना साक्षीने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सने जबर धक्का बसतो. साक्षीची फसवणूक करत प्रेस घेतल्याची बातमी चैतन्य- अर्जुनसमोर येते. आता अर्जुनही साक्षीचा खरा चेहरा प्रेससमोर आणणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Kevin Jonas Diagnosed With Skin Cancer

प्रियांका चोप्राच्या दीराला कर्करोग, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, आता अशी झाली आहे अवस्था

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.