शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका चोप्राच्या दीराला कर्करोग, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, आता अशी झाली आहे अवस्था

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kevin Jonas Diagnosed With Skin Cancer

प्रियांका चोप्राच्या दीराला कर्करोग, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, आता अशी झाली आहे अवस्था

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लग्नानंतर प्रियांका चोप्रा परदेशात स्थायिक झाली आहे. बरेचदा अभिनेत्री तिच्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. अशातच प्रियांका चोप्राच्या सासरच्या कुटुंबातील एका व्यक्तीबाबत खूप मोठी बातमी समोर आली आहे. प्रियांका चोप्राचा दीर आणि निक जोनासचा भाऊ केविन जोनास याला कॅन्सर हा आजार झाला असल्याचे समोर आले आहे. केविन त्वचेच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. (Kevin Jonas Diagnosed With Skin Cancer)

केविनने स्वतः इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. याबरोबर त्याने चाहत्यांना खास आवाहनही केले आहे. केविन जोनासने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या जखमेवर उपचार करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो असं बोलताना दिसत आहे की, “म्हणून आज मी माझ्या डोक्यातून बेसल सेल कार्सिनोमा काढत आहे. होय, हा खरं तर त्वचेचा लहान कर्करोग आहे जो वाढू लागला आहे. त्यामुळे ते काढण्यासाठी मला शस्त्रक्रिया करावी लागली”.’

आणखी वाचा – साक्षीने डाव पलटवला, प्रेस कॉन्फरन्स घेत अर्जुन-चैतन्यला शिकवला धडा, दोघांनाही बसलाय जबर धक्का

View this post on Instagram

A post shared by Kevin Jonas (@kevinjonas)

शस्त्रक्रियेनंतर घरी जाताना केविनने त्याच्या कारमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या कपाळावर शस्त्रक्रियेचे डाग बँडएडने झाकलेले दिसत आहेत. केविनने चाहत्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आणि त्यांच्या त्वचेची चाचणी घेण्यास सांगितले. त्याचा हा व्हिडीओ शेअर करत केनिन जोनासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमच्या त्वचेची चाचणी घेण्यासाठी एक मैत्रीपूर्ण सल्ला देत आहे”.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना मान्य असणार का पारू-आदित्यचं नातं?, गुरुजींनी केलेलं भाकीत ठरणार का खरं?, मालिकेत नवा ट्विस्ट

केविन जोनास निक जोनास व जो जोनास या भावांसह स्वतःचा म्युझिक बँड चालवतात. तो अनेकदा आपल्या भावांसह लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसतो. केविनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने १५ वर्षांपूर्वी डॅनियल जोनासशी लग्न केले होते. केविन व डॅनियलच्या दोन मुली आहेत. एलेना रोज आणि व्हॅलेंटिना अँजेलिना अशी त्यांची नावे आहेत. केविन अनेकदा आपल्या मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Tags: entertainmentkevin jonasKevin Jonas Diagnosed With Skin Cancerpriyanka choprapriyanka chopra brother in law
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Shashank Ketkar shared a video and expressed his anger after seeing the pile of garbage in the Goregaon Film City area.

"असला घाणेरडा परिसर आणि…", गोरेगाव फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढिग पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, "मोदीजी असो वा राहुलजी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.