‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, पूर्णा आजींनी सायलीला आपली नातसून म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या मनात सूनेची जी प्रतिमा आहे ती अगदी सायलीमध्ये दिसत असल्याचंही त्यांनी सर्वांसमोर कबूल केलं आहे. आज पर्यंत मी तुझ्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष केलं पण आज मी माझ्या खुल्या मनाने तुझा स्वीकार करत आहे, असं म्हणत त्या सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करतात. सायलीला हे सर्व स्वप्नवत वाटत. तर पूर्णा आजीच्या घरातील इतर सदस्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. (Tharal Tar Mag Promo)
मात्र सायली व अर्जुनसमोर मधुभाऊंची विलास मर्डर केसमधून निर्दोष व सुखरुप सुटका करण्याचे मोठे आव्हान असते. मधुभाऊंची सुटका करण्यासाठी त्यांना एक मोठा पुरावा हवा असतो. हा पुरावा नेमका काय असेल याचा अर्जुन विचार करतो. कारण प्रिया या सगळ्याचा एकमेव आयविटनेस आहे. पण ती मधुभाऊंच्या सुटकेसाठी बोलणार नाही हेदेखील त्यांना माहित असतं.
अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन व सायलीने मधुभाऊच्या सुटकेसाठी प्रियाचा वापर करायचा ठरवलेलं असतं. मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन प्रियाला प्रेमाचं खोटं आमिष दाखवून अडकवतो. कारण मधुभाऊंची सुटका करण्यासाठी त्याला प्रियाची मदत हवी असते. यासाठी तो प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करतो. तर हे नाटक जरी असलं तरी सायलीला मनोमनी वाईट वाटत असतं.
मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुन प्रियाला ऑफिसमध्ये बोलावून घेतो. आणि सांगतो की, मला माझी चूक कळली आहे. आणि असं म्हणत ते दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर इकडे सायली लपून बघत असते. आणि मनात म्हणते लांब राहा मी हे नाही पाहू शकत.