‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मालिकाविश्वात जुईने विशेष कामगिरी केली आहे. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकेत सायली ही महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. जुईचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. सोशल मीडियावरून ती नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Jui Gadkari On Ask Me Anything)
सोशल मीडियावरून जुईने चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनिथिंग’हा सेशन ठेवला होता. यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आस्क मी एनिथिंग हा सेशन बरेच कलाकार मंडळी चाहत्यांसह शेअर करतात आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देतात. अशातच जुईने देखील तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.
आणखी वाचा – लवकरच विवाहबंधनात अडकणार जुई गडकरी, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणाली, “पत्रिका…”
“नेहमी उठून अधिकाधिक मेहनत करायची आणि स्वतःच्या कामामध्ये सतत व्यग्र राहणं ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते”. असा प्रश्न एका चाहत्याने जुईला विचारला. यावेळी तिने अगदी हसतमुखाने उत्तर दिलं. शिवाय तिने एका चॅनलमध्ये नोकरी केली असल्याचंही यावेळी सांगितलं. प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करणं हे फक्त प्रेक्षकांच्या प्रेमापोटी शक्य आहे असं जुईचं म्हणणं आहे.
“अगदी लहानपणापासून मी कोणावरच अवलंबून नाही. मला हे क्षेत्र खूप आवडतं. लहानपणापासूनच मला असं वाटायचं की, आपल्याला टीव्हीमध्ये काम करायचं आहे. तेव्हा मला फारसं काही कळायचं नाही. मी एका चॅनलमध्येही नोकरीला होते. त्यामुळे मी या क्षेत्रामधील दुसरी बाजूही पाहिली आहे. एकूणच हे क्षेत्र मला खूप आवडतं. रोज उठून कामावर यावं असं वाटतं. प्रत्येक कामानंतर प्रेक्षक जे प्रेम देतात त्यामुळे बळ वाढतं. रोज काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळते. तुमच्या प्रेमामुळेच हे सगळं काही शक्य आहे”. अभिनयाची लहानपासून असलेली आवड जुईने जोपासत स्वतःच असं सिनेसृष्टीतील स्थान स्वतः तयार केलं. मेहनती, साधी, सुंसंस्कारी असलेल्या जुईने आजवर तिच्या स्वभावाने अनेकांच्या घरात स्थान निर्माण केलं.