शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“झाडू मारली, कलाकारांचे कपडे इस्त्री केले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा खुलासा, म्हणाली, “लोकांच्या लग्नात…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 13, 2023 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivali Parab share a Video

“झाडू मारली, कलाकारांचे कपडे इस्त्री केले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा खुलासा, म्हणाली, “लोकांच्या लग्नात…”

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातून अनेक नव्या दमाचे कलाकार पुढे आले असून अभिनेत्री शिवाली परबला याच कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिवालीच्या विनोदी अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचबरोबर तिच्या लूकचीही वारंवार चर्चा होत असते. हास्यजत्रेबरोबर चित्रपट व म्युझिक व्हिडिओमध्ये देखील ती झळकली आहे. (Shivali Parab share a Video)

काही महिन्यांपूर्वी शिवालीचं “पायल वाजे” हे म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं होतं, जे प्रचंड गाजलं आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी शिवाली नाशिकला गेली होती. यावेळी शिवालीचं नाशिककरांनी केलेलं आदरातिथ्य पाहून शिवाली भारावली. तसेच लहान मुलांशी संवाद साधताना आणि त्यांना ऑटोग्राफ देताना तिला यावेळी प्रचंड आनंद झाला होता.

त्याचबरोबर तिने या व्हिडिओत अनेक गोष्टींचा खुलासा करताना म्हणाली, “मी याआधी गुजराती चित्रपट करायचे, कारण तिथे पैसे चांगले मिळतात. पण तिकडे मी झाडू मारण्यापासून ते कलाकारांचे कपडे इस्त्री करण्यापासून अनेक गोष्टी केल्या आहे, आणि तिथे त्यांना बघून मी शिकले.” त्याचबरोबर ती हेदेखील म्हणाली, “जिथे मी एडिटिंग शिकले, त्या संस्थेसाठी मी लोकांच्या लग्नात जायचे. त्यांचे ट्रॅडिशनल व्हिडिओ शूट करायचे. माझ्याकडे त्या ट्रॅडिशनल व्हिडिओ एडिटिंगचं डिपार्टमेंट होतं, त्याचं एडिटिंग मी करायचे.”

हे देखील वाचा – ‘गडकरी’ चित्रपटात नितिन गडकरींच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ अभिनेता, चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

शिवालीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने नाशिककरांचे आभार मानले. ती यामध्ये म्हणाली, “तरुण मुलं-मुली, वयस्कर आजी-आजोबा, नोकरदार वर्ग, गृहिणी असे अनेक जण मला भेटतात, कौतुक करतात. पण जेव्हा लहान मुलं येऊन भेटतात आणि आपल्या कामाचं कौतुक करतात, ते काही वेगळंच असतं. तुम्ही मला इतकं प्रेम दिल्याबद्दल नाशिककर तुमचे आभार.”, असं म्हणत तिने ‘पायल वाजे’ गाणं यूट्यूबवर पाहण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा – लवकरच विवाहबंधनात अडकणार जुई गडकरी, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणाली, “पत्रिका…”

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात शिवालीने मोना डार्लिंग, शिवाली अवली कोहली यांसारखे अनेक पात्र गाजवली आहे. शिवाय, ती ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ चित्रपटातील बोल्ड सीनची जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून तिच्या रील्ससह फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत असते.

Tags: maharashtrachi hasyajatrashivali parabShivali Parab share a Video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
onkar bhojane health

डोळ्याचा मोठा त्रास, एका नसमुळे...; आजारपणामुळे ओंकार भोजनेची झाली होती अशी अवस्था, काम करणंही जमत नव्हतं कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.