छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर या मालिकेतील सायली-अर्जुन यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावतेय. मालिकेतील सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारत असून तिच्या या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली आहे. (Jui Gadkari On Caste)
जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावरुन नेहमीच अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर जुई नेहमीच तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते आणि चाहतेदेखील तिच्याविषयीची प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यात उत्सुक असतात.

अशातच जुईने चाहत्यांसह बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारल्या आहेत. जुईने बरेच दिवस गप्पा मारल्या नाहीत असं म्हणत एक सेशन घेतलं आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. दरम्यान एका चाहत्याने जुईला प्रश्न विचारताच तिने दिलेल्या उत्तराने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. जुईला तिच्या एका चाहत्याने, “ताई तुझी जात कोणती आहे”, असा प्रश्न विचारला. या प्रश्नांच जुईने दिलेलं उत्तर लक्षवेधी आहे. जुईने उत्तर देत म्हटलं की, “मी भारतीय आहे”. जुईच्या या उत्तराने तिच्याप्रती असलेला चाहत्यांचा आदर वाढला आहे.
जातपात, धर्म न मानणाऱ्या वक्तिमत्वात जुई येते. शिवाय ती कोणतीच जात न मानून स्वतःला भारतीय समजते. ‘ठरलं तर मग’ मालिकेआधी जुई छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकत आली. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे जुईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याशिवाय ती ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘सरस्वती’ या मालिकेतही दिसली. ‘बिग बॉस’ मराठीमुळे जुई चर्चेत आलेली पाहायला मिळाली.