गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमानंतर कुठे गायब झाला सागर कारंडे?, अभिनेता आता काय करतो?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 4, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sagar Karande is entertaining the audience with the play after chala hawa yeu dya see the details

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमानंतर कुठे गायब झाला सागर कारंडे?, अभिनेता आता काय करतो?

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यकमातून सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. या कार्यक्रमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, तर कधी पोस्टमन काका बनून प्रेक्षकांच्या डोळ्यातून खळकन पाणीही आणले आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागरने त्याच्या खास शैलीत सादर करत एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम अचूक केलं. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे घराघरांत लोकप्रिय झाला.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांचं हृदयस्पर्शी पत्रवाचनही प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरलं. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता आजारपणामुळे टीव्ही विश्वापासून दूर होता. यानंतर त्याने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधूनही एक्झिट घेतली. पण अभिनेता सध्या रंगभूमीवर चांगलाच कार्यरत आहे. सागर सध्या रंगभूमीवरील त्याच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Saagar Karande ???? (@saagarkarande)

आणखी वाचा – Video : अंबानी कुटुंबियांनी शाहरुख खानलाही जय श्रीराम बोलण्यास भाग पाडलं, स्टेजवरुनच जोरदार घोषणा केली अन्…; Inside Video व्हायरल

सागरच्या हीच तर ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाला प्रेक्षकांडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही व्यंग असते. अशातच त्या कुटुंबांमध्ये एक लव्ह स्टोरी सुरू होते. पुढे त्या लव्ह स्टोरीचं काय होतं? आणि ते घडताना काय धमाल उडते? अशी या नाटकाची कथा आहे. या नाटकात सागर कारंडेसह शलाका पवार, रमेश वाणी, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन व सायली देशमुख आदी कलाकार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतल्यानंतर सागर नुकताच ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये दिसला होता.

आणखी वाचा – Video : …अन् देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच स्टेजवरुन उठून गेले अमोल कोल्हे, राग व्यक्त करत म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना…”

दरम्यान, सागर कारंडे एक उत्कृष्ट अभिनेता व लेखक आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून तो घराघरांत पोहोचला. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने वेगवेगळ्या विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. सागरने छोटा पडदा गाजवण्याबरोबरच चित्रपटांमधूनही काम केलं आहे. ‘जलसा’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘बायोस्कोप’, ‘माय हिंदू फ्रेंड’ आणि ‘एक तारा’ या चित्रपटांत सागरने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Tags: सागर कारंडेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीentertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newssagar karande
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Dipika kakar and shoaib Ibrahim lovestory

पहिला घटस्फोट, नैराश्य अन् दुसरं लग्न करण्याचा निर्णय, दीपिका कक्करने शोएबबरोबर थाटला दुसऱ्यांदा संसार, मुस्लिम धर्माचा स्वीकार केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.