रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् डॉक्टरांकडे जाताच गणपतीचं गाणं बोलू लागला ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील मुलगा, क्युट व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amit bhanushali son video

Video : ...अन् डॉक्टरांकडे जाताच गणपतीचं गाणं बोलू लागला 'ठरलं तर मग'मधील अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील मुलगा, क्युट व्हिडीओ समोर

‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. या मालिकेतील अर्जुन व सायलीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अर्जुन ही भूमिका मालिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. तर सायलीच्या भूमिकेत अभिनेत्री जुई गडकरी पाहायला मिळत आहे. अमितच्या अर्जुन या पात्रामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (amit bhanushali son video)

सोशल मीडियावरही अमित बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा अमितचे सोशल मीडियावरील ट्रेंडिंग रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. अमितला हृदान नावाचा मुलगा आहे. त्याचं आणि हृदानचं सुंदर बॉण्डिंग नेहमीच त्यांच्या चाहत्यांना भारावून टाकतं. अशातच, अमितच्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – “सगळे अप्पीला का चुकीचं ठरवतात?”, ‘अप्पी आमची…’च्या कथेवरुन भडकले प्रेक्षक, अर्जुनलाच दिला दोष, म्हणाले, “मोठा गुन्हा…”

View this post on Instagram

A post shared by Shraddha Amit Bhanushali (@shraddhas09)

अमित भानुशालीची पत्नी श्रद्धा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या लेकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये याच्या मनात काय आलं कळलं नाही आणि हा अचानक गायला लागला”, असं कॅप्शन देत हृदानचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमितचा लेक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं गाताना दिसत आहे. आणि त्यावर तो डान्सदेखील करत आहे.

आणखी वाचा – “अशोकने पैशांची खूप मदत केली अन्…”, नाना पाटेकरांनी अशोक सराफांबाबत सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “गणपतीला पैसे नसताना…”

हृदानचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडीओवर चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. “हा खूप गोड आहे…मोठा झाल्यावर हुबेहूब अमितसारखा दिसेल”, “गोड…मी तुमच्या दोघांची खूप मोठी चाहती आहे”, “किती गोड आहे”, असं म्हणत कौतुक केलं आहे. गेली अनेक वर्ष मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अमित ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या मालिकेत अर्जुन-सायलीने साक्षीचा पर्दाफाश केलेला पाहायला मिळत आहे.

Tags: amit bhanushaliamit bhanushali son videomarathi actortharal tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाची तारीख अखेर जाहीर, लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल, नक्की कुठे पार पडणार सोहळा?

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाची तारीख अखेर जाहीर, लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल, नक्की कुठे पार पडणार सोहळा?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.