‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेने सात वर्षांचा ब्रेक घेतल्याने मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला. तब्बल सात वर्षांनी अप्पी व अर्जुन मालिकेत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. मात्र अद्याप अमोल त्यांचा मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर आलेलं नसतं. अप्पीदेखील स्वतःहून याबाबत काहीच सांगत नाही. (Appi Amachi Collector Serial)
सात वर्षांपूर्वी अप्पीची बदली होते तेव्हा अप्पी अर्जुनलाही तिच्याबरोबर यायला सांगते. मात्र अर्जुन नकार देतो. आणि यापुढे अर्जुन असंही सांगतो की, आपल्या बाळाला तू त्यांच्या वडिलांविषयी काहीच सांगायचं नाही. असं वचन तो अप्पीकडून घेतो. अप्पी गेली सात वर्ष अर्जुनला दिलेलं वचन पाळत असते. त्यामुळे अमोल त्यांचा मुलगा असल्याचं सत्य ती काही केल्या कोणालाही सांगत नाही.
मालिकेत सध्या अर्जुन वडिलांच्या इच्छेखातर दुसरं लग्न करण्यास तयार होतो. सध्या मालिकेत अर्जुन व आर्याच्या साखरपुड्याची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे अप्पी खचलेली पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकाला धरुन अप्पीवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडली आहे. अर्जुनच्या वागणुकीला अप्पीला दोष दिल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत अप्पीची बाजू सांभाळून घेतली आहे.

“सगळे अप्पीला का चुकीचं ठरवतात? अप्पी खंबीरपणे का उत्तर देत नाही?”, “मूर्ख रुपाली तिला माहित नाही का अर्जुनने अपर्णाला लांब ठेवले आहे. मुलाला ओळख सांगायची नाही असं अर्जुनने सांगितलं आहे”, “तुम्ही इतरांसाठी काय करता त्यांना त्याची पर्वाही नसते अपर्णाने रुपालीसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत आणि रुपालीने अपर्णाचा विश्वासघात केला आहे”, “सगळे अप्पीला का चुकीचं ठरवतात? अप्पी खंबीरपणे का उत्तर देत नाही?”, “एवढा कोणता मोठा गुन्हा केला अपर्णाने की तिला एवढी मोठी शिक्षा देतात”, असं म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेवर आक्षेप घेतले आहेत.