भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा म्हणजे अनंत अंबानी व राधिका अंबानी यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. जुलै महिन्यात अनंत व राधिका यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्च महिन्यात दोघांचाही गुजरात येथील जामनगरमध्ये शाही पद्धतीने प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. जगभरात त्यांच्या या सोहळ्याची खूपच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला आहे. त्याबद्दल आता अनेक अपडेट समोर येत आहेत. (ambani pre-wedding functions )
राधिका व अनंतच्या लग्नाची सर्वत्र सुरु आहे. २९ मे ते १ जून असा अलिशान क्रूझने प्रवास होणार असून यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मार्च रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाची एक झलक समोर आली आहे. यामध्ये अमेरिकन बॅंड बॅकस्ट्रीट बॉइज परफॉर्म करताना दिसले. तसेच या कार्यक्रमासाठी रणवीर सिंह, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासारखे अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये ‘बॅकस्ट्रीट बॅक’ गाताना दिसत आहेत. या बॅंडमध्ये निक कार्टर, होवी डोरो, ब्रायन लिटरेल, एजे मॅकलिन ब केविन रिचर्डसनदेखील समाविष्ट असलेले दिसत आहेत. हे सगळेजण पांढऱ्या कपड्यांमध्ये क्रूझवर पाहुण्यांच्या समोर परफॉर्म करताना दिसत आहेत. या क्रूझवरील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑरीने या क्रूझवरील अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये क्रूझच्या आतील रूम्सचे फोटो पाहायला मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे आता आकाश व राधिकाच्या लग्नपत्रिकेची झलक देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर व्हायरल झालेली पत्रिका ही लाल व सोनेरी रंगामध्ये दिसून येत आहे. यावर अनंत व राधिकाचे नाव असून लग्नविधी व दिवस देण्यात आले आहेत. हिंदू वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार असून ‘जिओ वर्ल्ड कॉन्वेन्शन सेंटर BKC’ येथे पार पडणार आहेत.