शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अशोकने पैशांची खूप मदत केली अन्…”, नाना पाटेकरांनी अशोक सराफांबाबत सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “गणपतीला पैसे नसताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nana Patekar On Ashok Saraf

"अशोकने पैशांची खूप मदत केली अन्…", नाना पाटेकरांनी अशोक सराफांबाबत सांगितलेला 'तो' प्रसंग, म्हणालेले, "गणपतीला पैसे नसताना…"

कठोर, बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आजवर नानांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाना पाटेकर व अशोक सराफ यांचं खास बॉण्डिंग असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. त्यांच्या मैत्रीचं अनेकदा उदाहरणही दिलं जातं. अशातच नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमधील व्यवहाराचा एक किस्सा सांगितला आहे. (Nana Patekar On Ashok Saraf)

नाना यावेळी किस्सा सांगताना असं म्हणत आहेत की, “अशोक सराफ हा त्याकाळी टॉपचा स्टार होता. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकांत आम्ही काम करायचो तेव्हा अशोक सराफला एका शोचे २५० रुपये मिळायचे आणि मला ५० रुपये मिळायचे. नाटकांत मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. आणि तो मुद्दाम १०,१५ रुपये माझ्याकडे हरायचा आणि मी ते मुद्दाम घ्यायचो. मला कळायचं की तो मुद्दाम हरत आहे. पण तेव्हा गरज होती म्हणून मी घ्यायचो. अशोकने अशी खूप मदत केली”.

आणखी वाचा – Video : स्वयंपाकघर, छोटाच हॉल अन्…; डोंबिवलीमध्ये इतकं साधं पण तितकंच सुंदर आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं घर, पाहा Inside Video

View this post on Instagram

A post shared by कॉमेडी_केली_हो (@comedy_keli_ho)

पुढे ते म्हणाले, “गणपतीच्या वेळेला पैसे नसताना एकेदिवशी सकाळी सहा वाजता फिल्मसिटीला तो जात होता. त्यावेळी तो माझ्याकडे आला आणि मी तेव्हा झोपलो होतो. “हा चेक घे आणि बँकेत १५ हजार आहेत तुला पाहिजे तेवढी रक्कम घाल”, असं तो म्हणाला. ही सत्तरची गोष्ट आहे. मी त्या चेकवर तीन हजार रुपये काढले. त्यानंतर हे पैसे खूप वर्ष मला परत करता आले नाहीत. त्यानंतर मी, कुलदीप पवार, अशोक, रंजना आम्ही ‘सावित्री’ नावाचा चित्रपट करत होतो. त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले”.

आणखी वाचा – “सगळे अप्पीला का चुकीचं ठरवतात?”, ‘अप्पी आमची…’च्या कथेवरुन भडकले प्रेक्षक, अर्जुनलाच दिला दोष, म्हणाले, “मोठा गुन्हा…”

“तेव्हा मी ते पैसे घेऊन त्याच्याकडे गेलो. तेव्हा तो मला म्हणाला, काय पाटेकर तुम्ही तर पैसेवाले झाले. तेव्हा मी म्हटलं, “अरे अशोक पैसेच परत करतोय वेळ परत नाही करु शकत”, असं मी म्हणालो.

Tags: ashok sarafentertainmentmarathi actornana patekarNana Patekar On Ashok Saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
amit bhanushali son video

Video : …अन् डॉक्टरांकडे जाताच गणपतीचं गाणं बोलू लागला 'ठरलं तर मग'मधील अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील मुलगा, क्युट व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.