सध्या ‘बिग बॉस’चं नवीन पर्व खूप चर्चेत आहे. यामध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले आहेत. पण सध्या गुणरत्न सदावर्ते यांची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळत आहे. ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यावेळी गुणरत्न यांची धमाकेदार एंट्री पाहायला मिळाली. त्यानंतरही त्यांची जादू प्रत्येक एपिसोडमध्ये पाहायला मिळाली. तसेच प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांचा एक स्वॅग बघायला मिळतो. मात्र पहिल्याच आठवड्यात त्यांचे नाव नॉमिनेशनमध्ये आले आहे. तसेच घरातील सदस्यांकडून त्यांना तुरुंगात जाण्याचा टास्क मिळाला. मात्र तुरुंगात जाण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. यावरुन त्यांनी घरात खूप राडा केल्याचेही समोर आले होते. (gunaratna sadavarte life)
‘बिग बॉस’मध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या वक्तव्यांमुळे सलमान खानलादेखील हसू आवरले नव्हते. त्यानंतर घरामध्येही त्यांची एक वेगळीच जादू पाहायला मिळाली. पण गुणरत्न नक्की कोण आहेत? ते काय करतात? याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. गुणरत्न यांचा नांदेड येथे जन्म झाला. त्यांचे वडील निवृत्ती सदावर्ते हे पोलिस विभागात काम करत होते तसेच राजकारणातदेखील त्यांचा सहभाग होता. गुणरत्न यांना शिक्षणाची खूप आवड होती. कायद्याचा अभ्यास करण्यामध्ये त्यांचा विशेष रस होता. अनेक सामाजिक विषयांमध्येही त्यांच्या अनेक चर्चा होत असत.त्यांनी रीतसर कायद्याचे शिक्षणदेखील घेतले.
काही वर्षांपूर्वी ते मुंबईमध्ये आले आणि इथे येऊन त्यांनी वकिली सुरु केली. वकिल बनण्याआधी त्यांनी पीएचडीदेखील घेतली आहे. त्यामुळे ते डॉक्टरदेखील आहेत. मात्र त्यांच्याबद्दल एक गोष्ट अनेकांना माहीत नाही, स्टेट बार कौन्सिलबरोबर चुकीची वागणूक केल्यामुळे त्याचे वकिलीचे लायसन्स २ वर्षासाठी निलंबित केले होते. तसेच चार वेळा तिहार तुरुंगातदेखील गेले आहेत. तसेच त्यांनी आजवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांसाठीदेखील लढले आहेत आणि आजवर अनेक मोठ्या केसेसदेखील लढले आहेत. तसेच त्यांच्या पत्नीचे नाव जयश्री असून त्यादेखील डॉक्टर आहेत.
तसेच त्यांच्या मुलीबद्दलदेखील एक अपडेट समोर आली होती. २२ ऑगस्ट २०१८ साली परळ येथे ‘क्रिस्टल प्लाझा’ इमारतीला आग लागली होती. तेव्हा गुणरत्न यांच्या १० वर्षांच्या मुलीने अनेकांचे प्राण वाचवले होते. तसेच तिला राष्ट्रीय वीरता पुरस्कारदेखील मिळाला होता.