टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर सध्या अधिक चर्चेत आहे. या वर्षी एकताने दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तुषार कपूर, रकुल प्रीत, जॅकी भगनानी, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, अंकिता लोखंडे, विकी जैन, हिना खान असे अनेक दिग्गज कलकार उपस्थित होते. मात्र या सगळ्यात ती इतरांपेक्षा अधिक चर्चेत राहिली. एकताचे काही व्हिडीओदेखील समोर आले असून याबद्दल आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या पार्टीमध्ये नक्की काय झाले? सोशल मीडियावर नक्की कशाबद्दल चर्चा सुरु आहे? याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (ekta kapoor viral video)
दिवाळी पार्टीमध्ये एकता कपूर अधिक चर्चेत राहिली आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आहे आहेत. यामध्ये ती स्वतः पोज देताना नाही तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. एकताचा एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये एकताबरोबर करण सिंह ग्रोव्हर दिसून येत आहे. ती करणला मिठी मारताना दिसून येत आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत स्वतः एकता करत असलेली दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हीडिओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हीला ओलखताच येत नाही आहे”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “एकता कपूरला बघून असं वाटत आहे की ही तुषार कपूरची बहीण आहे”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “हिचा ड्रेसिंग सेन्स झीरो आहे. इतकं एक्सपोज का करते ही”.
सोशल मीडियावर एकताच्या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. एकताची जवळची मैत्रीण अनीता हंसनंदानी, श्रद्धा आर्या, वामिका गब्बी, सोनाली बेंद्रे, रिद्धिमा पंडित, प्रियंका चाहर-चौधरी, दिव्यांका त्रिपाठी, विवेक दहिया हे कलाकारदेखील उपस्थित होते.