Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा याने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालबरोबर दिसले तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी आपल्या सासूबद्दलही एक खुलासा केला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांच्या सासूला ते आवडत नव्हते आणि त्यांनी त्यांना नाकारले होते. अर्चना पूरण सिंह यांनी पूनम सिन्हा यांना विचारले होते की, “दोघांपैकी कोणी पहिले प्रपोज केले?”. ज्यावर शत्रुघ्नने उत्तर दिले, ‘तिने माझ्याकडून प्रपोज करुन घेतलं”.
यानंतर पूनम सिन्हा यांनी पुढील कथा सांगितली. तिने सांगितले की, सुरुवातीला तिच्या आईने तिचे आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील नाते नाकारले होते. ती म्हणाली, “त्याचा (शत्रुघ्न सिन्हा) मोठा भाऊ माझ्या आईला भेटायला आणि बोलणीसाठी घरी आला. पण आईने नकार दिला आणि म्हणाली की अजिबात नाही, आम्हाला आमच्या मुलीसाठी फिल्म इंडस्ट्रीतील कोणताही मुलगा नको आहे”.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुनचं नातं बहरणार, एकमेकांसमोर देणार का प्रेमाची कबुली?, प्रोमोने वाढवली उत्सुकता
यानंतर पूनम सिन्हा यांनी पुढील कथा सांगितली. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक रोचक खुलासा केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सासूचे म्हणजेच पत्नी पूनम सिन्हाच्या आईचे शब्द सांगताना ते म्हणाले, ‘ती माझ्या भावाला म्हणाली – तू तुझा भाऊ पाहिलास का? हा बिहारी रस्त्यावरचा गुंड आहे आणि आमची मुलगी गोरीपान आहे’. शत्रुघ्न पुढे म्हणाला, ‘तुम्ही आम्हा दोघांना एकत्र उभे करुन कलर फोटो काढलात तर तो ब्लॅक ॲण्ड व्हाइट दिसेल.
आणखी वाचा – राजस्थानी लूक, राजेशाही थाट अन्…; अदिती राव हैदरी व सिद्धार्थने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो समोर
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचा विवाह ९ जुलै १९८० रोजी झाला. लग्नापूर्वी दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांची पहिली भेट पटनाहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये झाली होती.