Madhuri Dixit : मनोरंजन क्षेत्रात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितचं नाव घेतलं घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यामुळे तिने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक हिट चित्रपटांमधून माधुरीने महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १९९९ साली तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न केले. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केले. लग्नानंतर मात्र माधुरी चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्यानंतर ती पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली. लग्न केल्यानंतर ती परदेशात निघून गेली आणि अभिनयापासून दूर झाली. मात्र परदेशात स्थायिक झालेल्या अभिनेत्रीने भारतात येण्याचा निर्णय का व कसा घेतला याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
लग्नानंतर माधुरीने करिअरपेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य करत अभिनेत्री म्हणाली, “मला असं वाटतं, मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली. डॉ. श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं. कारण, काम करत असताना आपली स्वत:ची सुद्धा अनेक स्वप्नं असतात. माझ्यासाठी माझं घर, नवरा, माझी मुलं, सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं. जे मी पुरेपूर जगले”.
आणखी वाचा – “ते मुसलमान आहेत म्हणून…” संभल येथील हिंसेबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य म्हणाली, “नागरिकांची हत्या…”
पुढे मुंबईत परतण्याच्या निर्णयावर अभिनेत्री म्हणाली, “मुंबईत परतणं हा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला होता. माझे आई-वडील माझ्याबरोबरच राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं. त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा विचार केला. आई-बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही असं वाटलं, अरे भारतात जायला काय हरकत आहे? आमची मुलं सुद्धा येथील संस्कृती, भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात. कारण, परदेशात आपण एका कोशात वावरत असतो पण, इथे असं नाहीये”.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात. बेताच्या परिस्थितीतून मार्ग काढून लोक यशस्वी कसे होतात. हे सगळं माझ्या मुलांना समजणं गरजेचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. याशिवाय माझं सगळं काम भारतातच होतं. त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरु करायच्या होत्या. त्यामुळे विचार करुन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला”.