टेलिव्हिजन अभिनेत्री दृष्टी धामी ही खूप चर्चेत असते. लग्नाच्या नऊ वर्षानंतर दृष्टीला मूल होणार आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने नवरा नीरजबरोबर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लवकरच घरी पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले. येत्या ऑक्टोबर महिन्यात दृष्टी बाळाला जन्म देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र आता दृष्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आपल्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते यावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (drashti dhami baby bump)
सोशल मीडियावर नुकतेच दृष्टीने बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंना खूप पसंत केले आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिचे बेबी बंप खोटे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले. मात्र यावर दृष्टीने उत्तर देत काही फोटो पोस्ट केले आहेत. पोस्ट करत तिने लिहिले की, “हा पुरावा आहे की हे माझे बेबी बंप आहे. मोठं वाढलेलं जेवणाचं ताट नाही. मला विचारणाऱ्या सगळ्यांसाठी म्हणजे तुम्ही हे बघू शकत आहात का?”, हा व्हिडीओ पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.
या वर्षी १४ जून २०२४ रोजी दृष्टी व तिचा पती नीरजने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी पूर्ण कुटुंबासहित घरी पाहुणा येणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. तसेच एक पोस्टर शेअर करत लिहिले होते की, “गुलाबी असो व निळा, काहीही असेल तरीही आम्ही खूप खुश आहोत”. लग्नाच्या खूप वर्षानंतर ती आई होणार असल्याने खूप खुश आहे. तसेच तिला मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शुभेच्छादेखील दिल्या. त्याचप्रमाणे तिला कोणत्याही गोष्टीची गरज असल्यास सांगावे असेही सुचवण्यात आले आहे.
दृष्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘दिल मिल गये’, ‘गीत’, ‘मधुबाला’ अशा अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. सध्या ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेल देखील पाहायला मिळत आहे.