स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात चांगलीच घर करुन गेली. या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर चांगलीच लोकप्रिय झाली. तिने साकारलेले अप्पू म्हणजेच अपूर्वा वर्तक कानिटकर हे पात्र लोकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या मालिकेनंतर ती लवकरच अटा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्रीए सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिच्या या नवीन भूमिकेबद्दल व नवीन प्रॉजेक्टबद्दलची माहिती दिली आहे. ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत तिच्या नवीन कामाबद्दल सांगितलं आहे.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो. अशातच काही दिवसांपूर्वी ज्ञानदाने तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना एक खास प्रश्न विचारला होता. यांमध्ये तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांनी ओळखावे असं म्हटलं होतं. यावर तिच्या अनेक चाहत्यांनीही तिच्या नवीन कामाबद्दल अनेक उत्तरे दिली होती.
आणखी वाचा – रणवीर शौरीने ‘बिग बॉस’चा मोठा नियम मोडला, घरातच ओढली सिगरेट, अभिनेत्यावर प्रेक्षकांची टीका
अशातच आता ज्ञानदाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे तिने तिच्या हिंदी वेबसीरिजमध्ये काम करत असल्याबद्दल सांगितले आहे. ज्ञानदाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अनेक लोक मला “पुढे काय?” ही विचारत होते, तर हे आहे. माझी पहिली हिंदी वेबसिरीज, ‘कमांडर करण सक्सेना’ची ‘मिली’. येत्या ८ जुलै २०२४पासून तुम्हा सर्वांना भेटायला येत आहे”.
आणखी वाचा – गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ
दरम्यान, ज्ञानदा रामतीर्थकरची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या सीरिजमधील तिची मिली ही भूमिका पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सीरिजमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळेसुद्धा मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. यांच्यासह हिंदी अभिनेता गुरमीत चौधरी आणि इकबाल खान हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.