Rashmi Desai Second Marriage : अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते. रश्मीचे लग्न नंदीश संधूशी झाले होते. पण त्यांचे हे लग्न टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. रश्मीला तिच्या लग्नात खूप त्रास सहन करावा लागला. रश्मीला तिच्या प्रेम आयुष्यातही फसवणुकीचा सामना करावा लागला. याबद्दल तिने स्वतःच खुलासा केला. रश्मीच्या प्रेमकथेचा उलगडा ‘बिग बॉस’च्या घरात झाला. अरहान खान या शोमध्ये आला. रश्मीचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. पण शोमध्ये हे उघड झाले की अरहान रश्मीला फसवत होता.
लग्न आणि प्रेमाच्या बाबतीत रश्मीचे नशीब चांगले राहिले नाही. आता रश्मी दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य करताना बोलली आहे. ‘आज तक’च्या बातमीनुसार, रश्मी देसाईने लग्न आणि प्रेमाबद्दल भाष्य केले. रश्मीने एका मुलाखतीत सांगितले की, “मला प्रेमाबद्दल माहिती नाही, पण मी अनेक वेळा चुकीचा नंबर डायल केला आहे. मला वाटतं की देवाने माझ्यासाठी मुलगाच निर्माण केलेला नाहीये. तो विसरला आहे. माझे कुटुंब एका चांगल्या नात्याचा शोध घेत आहे. जर मला चांगला मुलगा मिळाला तर मी लग्न करु शकते पण घाई नाही”.
याशिवाय रश्मीने तिला कशा प्रकारचा मुलगा हवा आहे हेदेखील यावेळी सांगितले. रश्मी म्हणाली की, तिला कसा मुलगा हवा आहे त्या गोष्टींबद्दल तिने स्पष्ट असले पाहिजे. रश्मी देसाईचे २०११ मध्ये नंदीशशी लग्न झाले होते. पण हे लग्न ४ वर्षातच तुटले. २०१६ मध्ये रश्मीचा घटस्फोट झाला. रश्मीचे नाव सिद्धार्थ शुक्लाशीही जोडले गेले. तथापि, त्याने ते कधीही स्वीकारले नाही.
कामाच्या बाबतीत, रश्मीला ‘उत्तरन’ मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. या शोने तिला एका रात्रीत प्रसिद्धी मिळवून दिली. या शोमुळे रश्मी घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर रश्मी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.