‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता हा कार्यक्रम ओटीटीवरही सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आता तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्येच खूपच उत्सुकता पहायला मिळत आहे. चाहत्यांना कार्यक्रमाशी बांधून ठेवण्यासाठी निर्मात्यांकडून अनेक क्लुप्त्या आखल्या जातात. प्रीमियर समोर येण्याआधीच निर्मात्यांनी अनेक प्रोमो जारी केले आहेत. यामध्ये अनिल कपूर होस्टच्या स्वरूपात दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमातील संभाव्य सदस्यांची नावे समोर आली होती. आता घराची झलक समोर आली आहे. (big boss ott 3)
काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी आगामी सीजनसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तसेच लॉंच इव्हेंटची घोषणा मुनव्वर फारुकीने केली होती. आतापर्यंत ‘बिग बॉस’चे अनेक प्रोमो समोर आले आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकताच ‘बिग बॉस’कडून घराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र घराची चर्चा होत असलेली दिसून येत आहे.
Breaking #BiggBossOTT3 House
— The Khabri (@TheKhabriTweets) June 20, 2024
First Look and Tour pic.twitter.com/YpdrxrUGog
समोर आलेल्या फोटोंमध्ये आरसे दिसून येत असून सोनेरी रंगाची डिझाइन असलेल्या फ्रेम आहेत. यामुळे ते अधिक राजेशारी स्वरूपात असलेले दिसून येत आहे. तसेच फोटोमध्ये अनेक पेंटिंगदेखील दिसून येत आहेत. घराचे फोटो पाहून आता काहीट्री खास असणारे आहे असे दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कपूर करणार आहेत. त्यामुळे यावेळी काहीतरी झकास मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर निर्मात्यांनी पहिल्या दोन सदस्यांची झलक दाखवली आहे. त्यानंतर घरातील किचन, बेडरुम,गार्डनची झलकही पाहायला मिळाली आहे.
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला वडापावची विक्री करताना दिसत असून ती प्रसिद्ध वडापाव गर्ल असल्याचा चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. तसेच एक व्यक्ती टोपी घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तो रॅपर नॅजी असल्याचा अंदाज प्रेक्षकांची बांधला आहे. हा कार्यक्रम २१ जून २०२४ रोजी जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे.