शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुकेश खन्ना अजूनही अविवाहित, अभिनेत्याने आतापर्यंत लग्न का केलं नाही?, म्हणाले, “जितक्या गर्लफ्रेंड तितकं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2024 | 2:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh khanna on marriage

मुकेश खन्ना अजूनही अविवाहित, अभिनेत्याने आतापर्यंत लग्न का केलं नाही?, म्हणाले, "जितक्या गर्लफ्रेंड तितकं…"

 टेलिव्हिजनवरील ‘शक्तिमान’ ही मालिका आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. तसेच त्यांनी महाभारत या मालिकेमध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली आहे. आजही ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ते आता ६५ वर्षांचे आहेत. मात्र आजवर त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न अनेकदा चाहते त्यांना विचारतात. नुकताच त्यांनी आता याबद्दल खुलासा केला आहे. याबद्दलची पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. (mukesh khanna on marriage)

 मुकेश यांनी भीष्म पितामह या भूमिकेतील एक फोटोचा कोलाज शेअर केला आहे. तसेच या पोस्टवर लिहिले आहे की, “एक भीष्म प्रतिज्ञा कोणाचे लग्न थांबवू शकते का? लोकांना वाटते की माझ्याबरोबर असे झाले आहे. मी असा विचार करत नाही. लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येतात. पण आजवर मला अशी व्यक्ती भेटली नाही. कदाचित भविष्यात मिळेल”.

आणखी वाचा – सायलीसाठी अर्जुनने धरला निर्जळी उपवास, पोटात काहीच नसल्याने चक्करही आली अन्…; सगळ्यांसमोर सत्यही आलं

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

पुढे त्यांनी लिहिले की, “लोकांना हे देखील वाटते की जितक्या अधिक गर्लफ्रेंड म्हणजे तुम्ही पुरुष आहात. पण असे नाही. लोकांना असेही वाटते की पत्नीने पतीव्रता असावे. पण पतीनेही पत्नीव्रता असावे. पण माझं लग्न भीष्म प्रतिज्ञेमुळे थांबले नाही हे मात्र नक्की”.

आणखी वाचा – बेबीमूनसाठी निघाले दीपिका पदुकोण व रणवीर सिंह, विमानतळार एकदाही सोडला नाही बायकोचा हात, अशी घेत आहे काळजी

शक्तिमान या मालिकेमुळे मुकेश अधिक प्रकाशझोतात आले होते. आता यावर चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शक्तिमानची भूमिका अभिनेता रणवीर सिंह साकारणार आहे. मात्र यामुळे मुकेश खुश नसल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, “केवळ प्रसिद्धीच्या जोरावर हे पात्र चालणार नाही. शक्तिमान असा सुपरहिरो आहे ज्याला भारतीय मूल्यदेखील असले पाहिजेत. तसेच शिक्षकाची झलक असणेही महत्त्वाचे आहे”. त्यांच्या या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे आता ‘शक्तिमान’ चित्रपटात नक्की भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: instgram postmukesh khannashaktimaan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Amitabh Bachchan ignored Aishwarya Rai

लेकाचं कौतुक मात्र सूनेचं नावंही घेतलं नाही, अमिताभ बच्चन यांचं वागणं सगळ्यांनाच खटकलं, वादाची ठिणगी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.