रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरगुती हिंसाचार, प्रेमप्रकरण अन्…; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच लव्ह लाईफ ठरलं वादग्रस्त, घटस्फोटही झाला कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 18, 2024 | 2:35 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
rashmi desai divorce

घरगुती हिंसाचार, प्रेमप्रकरण अन्...; 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीच लव्ह लाईफ ठरलं वादग्रस्त, घटस्फोटही झाला कारण…

‘उतरन’ या मालिकेतून अभिनेत्री रश्मी देसाई अधिक नावारूपास आली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याचप्रमाणे रश्मी ‘बिग बॉस’च्या १३ व्या सीजनमध्येही दिसून आली होती. या क्षेत्रामध्ये काम करताना तिला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. मालिकेत काम करत असताना तिने सहअभिनेत्याबरोबर लग्नदेखील केले होते. मात्र हे लग्न अधिक काळ टिकू शकले नाही. ‘उतरन’ या मालिकेतील तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा नंदिश संधुबरोबर लग्नबंधनात अडकली होती. तिच्या लग्नानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. (rashmi desai divorce)

मालिकाविश्वामध्ये अनेक जोड्या बनतात. काही जोड्या टिकतात तर काही टिकत नाहीत. असेच काहीसे रश्मीबरोबर झाले. मालिकेला खूप प्रेम मिळत असताना तसेच तिच्या भूमिकेलाही पसंती मिळत असताना रश्मीची नंदिशबरोबर चांगली मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर एकमेकांवर अनेक आरोपदेखील केले होते. मात्र नक्की कारण काय हे मात्र अद्याप समोर आले नाही.

आणखी वाचा – नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न मोडण्याचे खरे कारण हे नंदिशची अनेक मुलींरोबर असलेली मैत्री खटकत असल्याचे रश्मीने सांगितले होते. तसेच घरगुती हिंसाचाराचे आरोपही त्याच्यावर केले होते. त्याच प्रमाणे रश्मी ही अतिसंवेदनशील असल्याने तिच्याशी असलेले नाते संपवले असल्याचे नंदीशने सांगितलं होतं. त्याने रश्मीला नाते वाचवण्यासाठी विनंतीदेखील केली. मात्र रश्मीने जेव्हा दुसऱ्यांदा घटस्फोटाची मागणी केली तेव्हा मात्र नंदिशने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही त्यांचे नातं वाचवण्यासाठी डान्स शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही.

आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

रश्मी व नंदिशने २०१२ साली लग्न केले. लग्नाला चार वर्ष पूर्ण होण्याआधीच २०१६ साली दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे रश्मी व नंदिश आता त्यांच्या नात्यावर कोणतेही भाष्य करणे पसंत करत नाहीत.       

Tags: nandish sandhurashmi desaitelevision actressutran
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Sukh Mhanje Nakki Kay asta fame Madhavi Nimkar expressed her feelings for her father by sharing a special video of his birthday.

“आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन...”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त बाबांबद्दल भावुक पोस्ट, म्हणाली, “तडजोड करुन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.