गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त बाबांबद्दल भावुक पोस्ट, म्हणाली, “तडजोड करुन…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukh Mhanje Nakki Kay asta fame Madhavi Nimkar expressed her feelings for her father by sharing a special video of his birthday.

“आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन...”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त बाबांबद्दल भावुक पोस्ट, म्हणाली, “तडजोड करुन...”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. ही मालिका टीआरपी यादीत कायम टॉप ५ मध्ये असते. यातील प्रत्येक पात्र चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर चाहते भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील नायिका जेवढी गाजली. तेवढीच गाजली ती मालिकेची खलनायिका माधवी निमकर. माधवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी माधवी अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही शेअर करत असते. 

माधवी अभिनय करण्याबरोबरच तिच्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते. ती तिच्या योगाचे व व्यायामाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटो व व्हिडीओला चहाते लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. माधवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बाबांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिने बाबांचा वाढदिवस कसा साजरा केला यांची खास झलक दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by madhavi nimkar (@maadhavinemkarofficial)

आणखी वाचा – बिग बॉस OTT 3 : अरमान मलिकसह त्याच्या पत्नीवर आहेत लहान मुलीवरील गंभीर अत्याचाराचे आरोप, तक्रारीची पोस्ट व्हायरल

या व्हिडीओमध्ये माधवी एका मोठ्या हॉटेलमध्ये बाबांचा वाढदिवस साजरी करताना दिसत असून यावेळी तिने बाबांच्या वाढदिवशी केक कापला असून त्यानी डोक्यावर वाढदिवसाची टोपीदेखील परिधान केली आहे. यावेळी माधवीच्या  आई-वडिलांसह तिचा भाऊ व वहिनीदेखील उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधत माधवीने तिच्या बाबांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काल बाबांचा वाढदिवस झाला. आषाढी एकादशी खुप चांगली साजरी झाली. आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन, तडजोड करुन नेहमी आनंद दिलात. जेवढ करता आलं. तेवढ सगळं केलत. आता तोच आनंद तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न मी करत्ये आणि करत राहिन”.

आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “दादा आणि वहिनी माझ्याबरोबर आहेच. आजही आई व बाबा यांची साथ मला आणि दादाला मिळत आहे यासाठी मी देवाची खुप आभारां आहे”. दरम्यान, माधवीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच माधवीच्या बाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  

Tags: madhavi nimkarmarathi actresssukh mhanje nakki kay asta
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Priyanka Chopra Birthday

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला नवऱ्याकडून रोमँटिक शुभेच्छा, शेअर केले Unseen Photo, म्हणाला, "तुझ्यासारखी स्त्री…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.