मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्यांचं ऐकून तो…”, ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांचे रणवीर सिंहवर आरोप, म्हणाले, “माझ्यासमोर तीन तास बसला कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 1, 2024 | 3:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh khanna on ranveer singh

शक्तिमानची भूमिका साकारण्यावरुन मुकेश खन्ना रणवीर सिंहला काय म्हणाले

टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आता या मालिकेचा आता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह सकारणार असल्याच्या चर्चादेखील सुरु आहेत. मात्र मुकेश यांनी रणवीरच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. सोशल मीडियावरदेखील त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी रणवीरच नाही तर अक्षय कुमार, आमीर खान यांपैकी कोणीच ही भूमिका करु शकणार नाही असंही सांगितलं होतं. ही भूमिका साकारण्यासाठी खूप प्रामाणिकपणा आणि निरागसतेची गरज असते आणि हे या अभिनेत्यांकडे नाही असेही ते म्हणाले होते. अशातच आता त्यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केले आहे. (mukesh khanna on ranveer singh)

मुकेश यांनी ‘बॉलिवूड ठिकाना’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, “शक्तिमानची भूमिका त्याला करण्यास द्यावी यासाठी रणवीर माझ्याकडे आला होता. हे मी लपवू शकत नाही. कारण लोक नंतर मी रणवीरचे कौतुक केले आणि त्याला एक चांगला अभिनेता म्हणालो असंही म्हणतील. यानंतर रणवीरच ही भूमिका सकारणार अशा चर्चादेखील सुरु झाल्या. पण अजूनही मी या निर्णयाशी सहमत नाही”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अंकिता खूप कुचकी”, निक्की-जान्हवीने मिळून अंकिताला केलं टार्गेट, नाश्ता न बनवण्यावरुन गोंधळ

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

पुढे त्यांनी सांगितले की, “माझे सोनी वाहिनीबरोबरदेखील वाद झाले होते. पण मी एक व्हिडीओ क्लिपद्वारे जाहीर केले होते की मी रणवीरला शक्तिमानची भूमिका साकारण्यासाठी मंजूरी देऊ शकत नाही. रणवीर माझ्यासमोर तीन तास बसला पण त्याच्या चेहऱ्यावर जे दिसायला पाहिजे ते नाही असं मला त्याला सांगावं लागलं. तो चंचल आहे आणि अशी व्यक्ती दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊ शकते”.   

आणखी वाचा – वडिलांच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर मलायका अरोराची पहिली पोस्ट, संपूर्ण घर कोलमडल्यानंतर म्हणाली, “आता सगळं काही…”

दरम्यान आता मुकेश यांच्या या वक्तव्याची मनोरंजन क्षेत्रात खूप चर्चा होताना दिसून येत आहे. रणवीर खूप चांगला अभिनेता असला तरीही त्याने शक्तिमानची भूमिका करण्याला नेहमी आक्षेप राहील असे ते बोलत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करण्यासाठी नक्की कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Tags: lead roleranveer singhshaktiman
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Aishwarya Narkar On netizens Trolling

"लाज वाटली नाही का?", बुद्धांचे प्रिंट असलेलं ब्लाऊज घातल्याने ऐश्वर्या नारकरवर भडकले नेटकरी, म्हणाल्या, "त्यांचे विचार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.