Sneha wagh married life : स्नेहा वाघ ही मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी मालिकांमधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये देखील तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. तिचे व्यावसायिक आयुष्य हे खूप चर्चेत राहिले आहे. मात्र याचबरोबर तिचे खासगी आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले आहेत. सोशल मीडियावरदेखील तिच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.
स्नेहाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे खासगी आयुष्य खूप गुंतागुंतीचे राहिले आहे. तिने दोन वेळा लग्न केले मात्र दोनीही वेळेला तिचे लग्न टिकू शकले नाही. आज तिच्या खासगी आयुष्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
मालिकांबरोबरच स्नेह ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात दिसून आली होती. याआधी ती ‘ज्योती’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेमध्ये तिने ‘मुरा’ ही भूमिका साकारली होती. तसेच ‘वीरा’ मालिकेमध्येही मुख्यभूमिकेमध्ये दिसून आली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. सध्या ती ‘सुहागन चुडेल’ या मालिकेमुळे अधिक चर्चेत आहे. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. यावेळी तिला विचारले की, “तू अजूनही प्रेमाच्या शोधात आहेस का?, त्यावर तिने उत्तर दिले की, “नाही, सध्या मी यासाठी अजिबात तयार नाही. मनी एकटी खूप खुश आहे आणि मला एकटं राहायला आवडतं”.
स्नेहा वयाच्या १९ व्या वर्षीच अभिनेता अविष्कार दारव्हेकरबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र तिला या लग्नामध्ये मानसिक व शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला होता. या सगळ्याला कंटाळून तिने अविष्कारबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर स्नेहाने पुन्हा एकदा २०१५ साली इंटीरियर डिझाईनर अनुराग सोलंकीबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर आठ महिन्यातच तिने दुसऱ्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घेतला. सध्या ती एकटी आयुष्य जगत असून कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवत आहे.