रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या आदेशावरुन किर्लोस्कर बंगल्यात होणार मंगळागौरचे खेळ, दिशा-दामिनीचा नवा प्लॅन, कार्यक्रमात आणतील का अडथळा?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2024 | 9:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial todays episode Update

अहिल्यादेवींसमोर आलं मंगळागौर पूजेचं सत्य, सावित्रीने सांभाळली बाजू, दामिनीचा डाव तिच्यावरच पलटला

Paaru Marathi Serial Update :  ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, तिकडे दिशाच्या खोट्या वागण्यामुळे प्रीतम खूपच नाराज असतो. त्याला काय करावं कळत नाही. त्याच वेळेला तिथे प्रिया मॅडम येतात आणि विचारतात की, काय झालं आहे. त्यावर प्रीतम सांगतो की, मी खूप अपसेट आहे आणि मला जीव द्यावा वाटतोय, असं म्हणून तो स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. तेव्हा प्रियाला वाटतं की, प्रीतमने खरंच जीव दिला आहे. प्रीतमची घुसमट होत असल्याने प्रीतमने असं केलं आणि प्रीतमला वाचवण्यासाठी ती सुद्धा पाण्यात उतरते. मात्र प्रियाला पोहता येत नसतं. त्यावेळेला प्रीतमच प्रियाचा जीव वाचवतो. आणि तिला बाहेर आणतो.

तेव्हा पारू आदित्य दोघेही त्यांना आधी फ्रेश होऊन यायला सांगतात. पारू प्रियाला घेऊन स्वतःच्या घरी जाते आणि फ्रेश व्हायला सांगते. त्यानंतर प्रियाला तिच्या त्या मित्राचा फोन आलेला असतो. त्याच्याशी बोलत असताना इकडून प्रीतम सांगतो की, तुम्ही त्या प्रीतम सरांच्या जवळ तर नाही जात आहात ना. यावर प्रिया नाही असं म्हणते. प्रिया त्या मित्राशी पारूची ओळख करुन देते. तेव्हा पारू व प्रीतमला यापूर्वीच हे सगळं काही माहिती असतं. पारू प्रीतमची चांगली टेर खेचताना दिसतो. तर एकीकडे पारू व सावित्री यांनी मंगळागौरीच्या पूजेचा थाट घातलेला असतो.

आणखी वाचा – “माझ्यावर चढू नका”, पापाराझींवर भडकली तापसी पन्नू, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले, म्हणाले, “ही भविष्यात…”

अखेर मंगळागौरीची पूजा अहिल्यादेवींच्या सांगण्यावरून पूर्ण केलेली असते. हे पाहून दोघेही खूप खुश असतात. पारू सावित्रीचा आशीर्वाद घेते त्यावेळी तिथे दामिनी येते आणि ती हे सगळं काही पाहते. त्यानंतर दामिनी पारूला खेचत घेऊन अहिल्यादेवी समोर उभी करते आणि मंगळागौरीच्या पूजेबद्दल सांगते. मंगळागौरीची पूजा ही पारूच्या मैत्रिणीची आहे असं अहिल्यादेवी सांगतात मात्र दामिनी सांगते की, तिथे हिची कोणतीच मैत्रीण नव्हती. सावित्री व पारू होत्या. तेव्हा सावित्री अहिल्या देवीसमोर खोटं सांगते की, ही पूजा माझी आहे. भले माझा नवरा माझ्याबरोबर राहात नसला तरी आता त्यांची तब्येत थोडी खालावली आहे असं कानावर आलं. त्यामुळे त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मी हे व्रत करायचं ठरवलं आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींच्या डोळ्यात पाणी येत. अहिल्या देवी म्हणतात की, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस?, आता मंगळागौरीची पूजा तर झाली आहे. आता मंगळागौरीचे खेळ हे आज या बंगल्यात होतील असं म्हणून त्या आदेश देतात की चला तयारीला लागा. तर इकडे सावित्री पारूला भेटायला आलेली असते आणि पारू तिला मिठी मारते आणि सांगते की, तुमच्यामुळे ही मंगळागौरीची पूजा झाली.

आणखी वाचा – निव्वळ विकृती! गुरमीत चौधरीच्या जुळ्या मुलींनाही ट्रोल करणं सोडलं नाही, अभिनेता भडकला, म्हणाला, “आम्हाला भोगावं लागतंय कारण…”

यावर सावित्री सांगते की, पण आता मंगळागौरीचे खेळ आहेत काही झालं तरी तू दामिनी मॅडम समोर फुगडी घालायची नाही. मी त्यांच्या मंगळागौरीला पाहिलं आहे। त्या फुगडीचा वेग धरतात आणि हात सोडून देतात अशाने त्यांनी अनेक जणांना जखमी केले आहे. हे ऐकल्यावर पारूला कळत नाही की, त्या नेमक्या अशा का वागत आहेत. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात दिशा व दामिनी मिळून या मंगळागौरीच्या खेळांमध्ये कोणता अडथळा तर नाही आणणार ना हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serial updatepaaru serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 todays episode

Bigg Boss Marathi : "पोरांसमोर मिरवतात, तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांनाही पश्चाताप होत असेल…", वर्षा उसगांवकरांना नको नको ते बोलली जान्हवी, प्रेक्षकांचा संताप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.