शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन वेळा घटस्फोट, पदरात दोन मुलं अन्…; मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आता परिस्थिती कशी?, जगत आहे असं आयुष्य

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shweta tiwari life

दोन वेळा घटस्फोट, पदरात दोन मुलं अन्…; मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आता परिस्थिती कशी?, जगत आहे असं आयुष्य

लहान पडद्यावरील ‘कसोटी जिंदगी की’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेतून प्रेरणाची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही अधिक प्रकाशझोतात आली. त्यांनंतर तिने अनेक मालिकांमध्येही काम केले आणि आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. मालिका केल्यानंतर तिने काही चित्रपट व वेबसिरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण ती व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैवाहिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. (shweta tiwari life)

श्वेता वयाच्या १८ व्या वर्षी राजा चौधरीबरोबर लग्न केले. पण त्यानंतर दोन वर्षांमध्येच वयाच्या २०व्या वर्षी मुलगी पलकला जन्म दिला. त्यावेळी तीचे करिअरदेखील चांगले सुरु होते मात्र तिच्या खासगी आयुष्यात खूप चढ उतार येत होते. मुलीच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात खूप समस्या येऊ लागल्या  होत्या.

आणखी वाचा – “माझे सासू-सासरेही तुमच्याच टूरला आहेत”, बायको-मुलांसह काश्मीरला गेलेल्या सुबोध भावेच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट, बायकोचा रिप्लाय, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

लग्न झाल्यानंतर काही वर्षांमध्ये तिच्यामध्ये व पती राजा यांच्यामध्ये वाद-विवाद होऊ लागले. त्यानंतर तिने त्याच्याबरोबर घटस्फोटही घेतला. श्वेताने राजावर मारहाण केल्याचे आरोप केले होते. राजाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षातच तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आले. तिने तिचा जुना मित्र अभिनव कोहलीबरोबर दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र या नात्यामध्ये ति खुश नव्हती. श्वेता व अभिनव यांना रियांश नावाचा मुलगा आहे. पण लग्नामध्ये अधिक वाद असल्याने सहा वर्षानंतर तिने अभिनवबरोबरही घटस्फोट घेतला.

आणखी वाचा – लक्षवेधी संवाद, जबरदस्त भूमिका, अन्…; अजय देवगणचा ‘मैदान’चा ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांच्याही वाढल्या अपेक्षा, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्यूज

दोन वेळा लग्न मोडल्याने श्वेता अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले. सगळ्यांनी तिला चुकीचं म्हणत असतानाही तिने अजिबात हार मानली नाही. तिने आपल्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ केला. तिची मुलगी पलकने ‘भाईजान’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पणही केले.

याबरोबरच मालिका विश्वामध्ये नाव कमावल्यानंतर आता श्वेता बॉलिवूड व ओटीटीकडे वळली आहे. नुकतीच ती दिग्दर्शक रोहित शेट्टीची दमदार सिरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आली होती. तसेच ती आता त्याच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्येही दिसणार आहे. तिची भूमिका नेमकी काय असेल याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे.  

Tags: daily soapott seriesShweta Tiwaritelevision actresstv actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Bubling Lake Video

Video : गोव्यामध्ये असणाऱ्या 'त्या' गावातील तलावाजवळ टाळ्या वाजवल्या की पाण्यातून येतात बुडबुडे, दैवी चमत्कार की आणखी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.