आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडत. कलाकार मंडळी चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्याच्या कुटुंबियांचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावरुन शेअर करतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता सुबोध भावे. सुबोधचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि त्यांच्या या चाहत्यावर्गाला अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घयायला नेहमीच आवडते. (Subodh Bhave Family Trip)
सोशल मीडियावर सक्रिय असलेला सुबोध नेहमीच सोशल मीडियावरुन त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत अपडेट देत असतो. अशातच अभिनेता आता त्याच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन कुटुंबाबरोबर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या भावे कुटुंब सहपरिवार काश्मीर दौऱ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. अभिनेता त्याच्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. याचे खास फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअरदेखील केले आहेत.
सुबोधने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलं दिसत आहेत. सुबोधची दोन्ही मुलं कान्हा आणि मल्हारही या फोटोंमध्ये धमाल, मस्ती करताना दिसत आहेत. तर त्याची पत्नी मंजिरीनेही विमानाने प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. इतकंच नव्हेतर सुबोधने काश्मीरमधील मार्तंड मंदिराला भेट दिल्यानंतरचा एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. सुबोधने शेअर केलेल्या या फोटोंवर त्याचे चाहते लाईक्स व कमेंटचा भरभरुन वर्षाव करताना दिसत आहेत.
सुबोध नेहमीच त्याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. बरेचदा तो कुटुंबाबरोबर ट्रिप एन्जॉय करतानाही दिसला आहे. त्यांच्या राजस्थान ट्रिपचे फोटोही चर्चेत राहिले. पुन्हा एकदा सुबोधचा कुटुंबाबरोबरचा हा काश्मीर दौरा पाहून “सर तुमची फॅमिली खूप छान आहे”, “सुंदर फॅमिली”, असं म्हणत त्यांच्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे. सुबोधच्या या व्हिडीओवर एका चाहतीने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “सर,तुमच्या ट्रिपमध्ये माझे सासु-सासरेपण आहेत. विजय हिरेमठ व स्नेहा हिरेमठ,पुणे”, असं म्हटलं आहे. यावर सुबोध भावेच्या पत्नीने कमेंट करत, “भेटले”, असं म्हटलं आहे.