टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. रुबिना आजवर अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आई झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींच्या जन्मादरम्यान तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. त्यानंतर अनेकदा मुलींविषयीचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर केले. अनेक पॉडकास्टमध्येही तिने मुलींबद्दलच्या अनेक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुलींच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही गोड फोटो शेअर केले होते. जिवा व इधा यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. (rubina dilaik on daughters)
रुबिना नुकतीच पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या मुलींबद्दल भाष्य केले. यावेळी तिने मुलींना मुंबईमध्ये न ठेवता हिमाचलमध्ये मोठं करत असल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली, “मुलींना चांगलं वातावरण मिळावं यासाठी मी व अभिनव खूप सजग आहोत. जेव्हा मी व अभिवन बाळासाठी प्रयत्न करत होतो तेव्हाच मुलं कुठे मोठी होणार, कशी मोठी होणार? याबद्दल ठरवलं होतं. मुलं जमिनीशी जोडलेली असावीत आणि त्यांनी गावचे आयुष्य बघावे असे आम्हाला वाटायचे”.
पुढे ती म्हणाली, “आम्हाला त्यांना स्वच्छ वातावरणात मोठं करायचं आहे. मातीत खेळावं, चांगल्या ठिकाणी मोठी व्हावीत. तसेच जितकं जमेल तितकं गावाशी जोडलेले राहतील आणि शेतीमध्ये पिकलेले धान्य त्यांना मिळेल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत”. दरम्यान रुबिना स्वतः हिमाचलची असून ती तिथेच लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे मुलीदेखील अशा वातावरणात मोठ्या व्हाव्यात असे तिला वाटते.
रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना ही हिंदी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.