Crime patrol actor Actor Raghav Tiwari : ‘क्राइम पेट्रोल’ फेम प्रसिद्ध असलेला अभिनेता राघव तिवारी याच्यावर गेल्या महिन्यात जीवघेणा हल्ला झाला होता. ३० डिसेंबर रोजी मुंबईतील वर्सोवा येथे रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली होती. यावेळीच हा हल्ला घडून आला असल्याच समोर आलं. राघव तिवारीच्या म्हणण्यानुसार, दुचाकीला धडकल्यानंतर दुचाकीस्वाराने त्याच्यावर जोरदार हल्ला केला आणि त्याच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती देताना त्याने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा तो त्याच्या मित्राच्या गाडीतून खाली उतरुन रस्ता ओलांडत होता. माफी मागितल्यानंतरही दुचाकीस्वाराने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याला धक्काच बसला.
राघव तिवारी म्हणाले, “यानंतर तो रागाच्या भरात दुचाकीवरुन खाली उतरला आणि त्याने माझ्यावर दोनदा वार केले. त्यानंतर त्याने माझ्या पोटात लाथ मारली. मी जमिनीवर पडलो. मला मारण्यासाठी त्याने त्याच्या दुचाकीच्या ट्रंकमधून दारु घेतली. आणि त्यानंतर बाटली आणि लोखंडी रॉड काढला”. अभिनेत्याने सांगितले की बाईकस्वाराने त्यालाही चापट मारली आणि स्वसंरक्षणार्थ राघवने लाकडाचा तुकडा उचलला आणि दुचाकीस्वाराच्या हातावर मारला.
आणखी वाचा – “दिवसा आई बोलायचे आणि रात्रीची ऑफर देऊन…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली…
पुढे अभिनेता म्हणाला, “त्याच्या हातातून दारूची बाटली पडली, पण यामुळे तो आणखीनच चिडला आणि त्याने माझ्या डोक्यावर लोखंडी रॉडने दोनदा मारले”. तो पुढे म्हणाला, “या धक्कादायक घटनेनंतर आरोपीने तात्काळ घटनास्थळावरुन पळ काढला आणि त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले, या हल्ल्यात त्याच्या डोक्याला टाके पडले”.
आणखी वाचा – शिवानी सोनार व अंबर गणपुळेची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
वृत्तानुसार, राघव तिवारी पुढे म्हणाले की, दुचाकीस्वार हा व्यावसायिक चाकू हल्ला करणारा असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर राघवने दुचाकीस्वाराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. राघवने पोलिसांबद्दल निराशा व्यक्त केली आणि दावा केला की त्यांनी आपले ऐकले नाही आणि गुन्हा नोंदविण्यात अपयशी ठरले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असा दावा अभिनेत्याने केला आहे.