बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खान व सोहा अली खान यांचे वडील मंसूर अली खान यांची ८५ वी जयंती साजरी केली गेली. हा दिवस खास बनवण्यासाठी सोहाने सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सोहाबरोबर कुणाल खेमू व मुलगी इनाया यांच्याबरोबर कबरीच्या जवळ गेली आणि त्यासमोर मेणबत्ती व केक ठेवला. हे सगळं सोहाने वाडिलांसाठी खूप प्रेमाने केले मात्र तिची ही कृती अनेकांच्या पचनी पडली नाही. अनेकांनी तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत ट्रोल केले आहे. सोहाची कोणती कृती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली नाही? तसेच नेटकरी काय म्हणाले? हे जाणून घेऊया. (soha ali khan viral post)
सोहाने इनंस्टाग्रामवर वडिलांच्या आठवणीत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती कुणाल व इनाया यांच्याबरोबर दिसत आहे. सगळेजण एक केकचा तुकडा त्यांच्या कबरीजवळ घेऊन गेलेले दिसून येत आहेत. तसेच या फोटोंमध्ये इनायाने मेणबत्ती विझवून केक आजोबांच्या कबरीजवळ ठेवताना दिसत आहे. मात्र सोहाची ही पोस्ट बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सोहाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल शून्य ज्ञान असते. अल्लाह त्यांच्या पापांना माफ करो आणि स्वर्गात जागा मिळो. तुम्ही फतेह वाचली पाहिजे. कृपया असे करु नका. इस्लाममध्ये या सगळ्याची परवानगी नाही”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “वेडे लोक”. दरम्यान आता या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
सोहा व कुणाल हे दोघंही भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. २५ जानेवारी २०१५ रोजी दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांनी केवळ घरच्या आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांना एक मुलगी असून त्यांना इनाया नावाची मुलगी आहे. तिच्या जन्म २९ सप्टेंबर २०१७ रोजी झाला. सध्या कुणाल अभिनयाबरोबरच चित्रपटांचे दिग्दर्शन करतानाही दिसतो.