टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर ही सध्या खूप चर्चेत असलेली पाहायला मिळते. २०२३ साली ती निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नाला वर्ष होण्याआधीच दोघंही वेगळे झाले. सुरुवातीला या सर्व प्रकाराबद्दल तिने मौन ठेवले होते. मात्र नंतर निखिलने स्वतः हे लग्न झालं नसल्याचा खुलासा केला आणि हे लग्न म्हणजे केवळ एक कार्यक्रम होता असेही सांगितले. इतकेच नाही तर त्याचे विवाहबाह्य संबंधदेखील होते आणि त्याला भारतातदेखील पाहिले गेले. त्यामुळे आता दलजितचे दुसरे लग्न वाचण्याची कोणतीही आशा नसल्याचे समोर आले आहे. (dalljiet kaur instagram story)
या लग्नामध्ये वादविवाद सुरु झाल्यापासून दलजित केनियामधून भारतात परतली. त्यानंतर तिने आपल्या भावना जाहीर करण्यास सुरुवात केली. निखिलने किती अत्याचार केले आणि त्यामुळे तिला किती दु:ख सहन करावे लागले. याबद्दल तिने मानमोकळेपणाने सांगितले. १६ सप्टेंबर २०२४ रोजी तिने एक निखिलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये तो कॉफी पिताना दिसत होता. यामध्ये त्याच्या हातात एक सोन्याची अंगठी होती ज्यामुळे दलजितला धक्का बसला आहे.
दलजितने सोशल मीडियावर सांगितले की, “पुन्हा अंगठी घातली आहे”. तिने निखिलची पार्टनर सफीनाचेदेखील नाव घेतले आहे. तिने लिहिले की, “शुभेच्छा एसएन,सोशल मीडियावर पुन्हा दिसलीस त्यामुळे तुझे कौतुक केले पाहिजे. तुम्ही दोघांनीही खूप छान केले. निखिलने पुन्हा एकदा अंगठी घातली आहे. खूप छान”.
दलजितने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलकच नोटदेखील शेअर केली आहे. दलजितने लिहिले की, “भारतात त्याची अजून एक पत्नी आहे हे निखिलची पार्टनर सफीनाला माहीत आहे का? ती मान्य करो किंवा करु नये पण आहे. तसेच भारतीय न्यायिक अधिकारी लवकरच निखिलच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगणार आहे. तसेच ही अंगठी एक दागिना म्हणून घातला आहे असेही अभिनेत्रीने सांगितले आहे. मला त्याची रणनीती माहिती आहे”. याआधीदेखील इन्स्टाग्राम लाईव्हवरुन दलजितने राग व्यक्त केला आहे.