‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले अभिनेते, निवेदक म्हणजे आदेश बांदेकर. आदेश बांदेकर हे मनोरंजन क्षेत्रासह राजकारणातही तितकेच सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकारणातही त्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेक माणसे त्यांनी जोडली आहेत. यात त्यांच्या अनेक ओळखीही झाल्या आहेत. याच ओळखीतून अनेकजण आदेश यांना काही ठिकाणी बोलवत असतात आणि बांदेकर आवर्जून भेटीही देत असतात. (Aadesh Bandekar Ganeshotsav Mandal)
आदेश बांदेकर हे मनोरंजन, राजकारणात तर सक्रीय आहेतच. पण ते सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या अनेक दैनंदीन गोष्टी व कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बांदेकरांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील अभ्युदय नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचा व्हिडीओ आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये फक्त तेच नाहीत तर त्यांची पत्नी सूचित्रा बांदेकर व मुलगा सोहम बांदेकरही पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकरांनी सपत्नीक या गणपती मंडळात आरती केली असून याचे खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. “अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ … घालिन लोटांगण वंदिन चरण” असं म्हणत आदेश बांदेकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभ्युदय नगरमध्ये आदेश बांदेकरांचे बालपण गेले असून या गणपती मंडळाला त्यांनी आवर्जून भेट दिल्यानिमित्त त्यांचे कौतूक होत आहे. आदेश यांनी बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण केल्यानंतर आशीर्वादही घेतले.
दरम्यान, आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत तूफान प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी आदेश बांदेकरांच्या या साधेपणाचेदेखील कमेंट्सद्वारे कौतूक केलं आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आदेश बांदेकरांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.