रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “यावेळी अरबाज घराबाहेर जाऊ शकतो”, अभिजीतचं ‘ते’ विधान चर्चेत, म्हणाला, “टास्कपुरता खेळतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 17, 2024 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Abhijeet Sawant said that Arbaaz Patel can out of the house

“Bigg Boss Marathi 5 मधून अरबाज बाहेर जाऊ शकतो”, अभिजीतचं विधान, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता ८ व्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरू होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या घरातील खेळ आता आणखीनच रोमांचक होत चालला आहे. आठवा आठवडा सुरु होताच आता ही स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. नुकताच भाऊच्या धक्क्यावर वैभवने घराचा निरोप घेतला. तर, आर्याला निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी निष्कासित करण्यात आलं. यामुळे गेल्या आठवड्यात २ जण बेघर होऊन आता घरातील उर्वरित १० सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’चा पुढचा खेळ रंगणार आहे. वैभव बाहेर गेल्याने आता ‘टीम ए’ पूर्ण कोलमडून गेली आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

एकीकडे जान्हवीने आधीच या ग्रुपबरोबर संबंध तोडले आहेत. तर दुसरीकडे वैभवही या घरातून बाहेर गेला आहे. त्यामुळे आता ‘टीम ए’मधील फक्त निक्की व अरबाज हे दोघेच टीम म्हणून खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. सोमवारच्या भागात ‘बिग बॉस’ने टीम आखून दिल्यामुळे जान्हवी अरबाज व निक्की यांच्याबरोबर खेळली असली तरी तिने स्वत: स्वतंत्र गेम खेळणार असल्याचे बिग बॉसची कॅमेऱ्यात सर्वांना सांगितले आहे. त्यामुळे आता निक्की व अरबाज या दोघांचीच टीम असल्याचे दिसत आहे. अशातच एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात पॅडी व अभिजीत त्यांच्याबद्दल गॉसिप करतानाचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 18 September Horoscope : मंगळवारच्या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या…

नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये अभिजीत पॅडी यांना असं म्हणतो की, “अरबाज यावेळी जाऊ शकतो. निक्कीबरोबर गुळूगुळू करण्यातच त्याचा वेळ जातो. टास्कपुरता बाहेर येतो आणि टास्क झाला की आपल्या गुहेत जाऊन बसतो. सिंह जसा शिकरीला न जाता सिंहीणीकडून शिकार करून घेतो तसं तो करत आहे”. त्यामुळे अभिजीतने अरबाजला सिंह म्हटलं असलं तरी घाबरा व टास्कपुरता गेम खेळणारा सिंह म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने अरबाज या आठवड्यात बाहेर जाऊ शकतो असंही म्हटलं आहे. त्यामुळे अभिजीतच्या म्हणण्याप्रमाणे अरबाज बाहेर जाणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील नॉमिनेशन टास्कमध्ये टीम A बाद, ‘हे’ सदस्य झाले थेट नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

दरम्यान, थेट नॉमिनेटेड सदस्यांमध्ये अरबाजचाही समावेश आहे. या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने ‘टीम ए’थेट नॉमिनेट होते. यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज असे पाच सदस्य थेट नॉमिनट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घरात राहणार? आणि कोण बाहेर जाणार? हे आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: abhijeet sawantArbaaz PatelBigg Boss Marathi 5 New Promo
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
मुंबईतील अभ्युदय नगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचा व्हिडीओ आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Video : अभ्युदय नगरच्या गणपतीला कुटुंबासह आरतीला पोहोचले आदेश बांदेकर, चाळीतील जुन्या दिवसांची आठवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.