हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी आल्यानंतर त्याबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. दलजितने गेल्या वर्षी व्यावसायिक निखिल पटेलबरोबर लग्नबंधनात अडकली. पण आता या लग्नामध्येही मतभेद सुरु झाले. त्यामुळे आता दोघेही वेगळे होणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दलजित कौरने लेहंगा घालून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला त्यावरून पुन्हा एकदा ती चर्चेत आली. पण पुन्हा एकदा तिने निखिलवर काही आरोप केले आहेत. (dalljiet kaur on husband nikhil patel)
दलजितने निखिलवर फसवण्याचा आरोप केला आहे. निखिल त्यांच्या नात्याला स्वीकारले नाही असे म्हणत आहे. त्यामुळे तिला खूप समस्या असल्याचेदेखील म्हंटले जात आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र तिने ही पोस्ट डिलिट केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, “माझे कपडे, चुडा, माझे मंदिर तसेच माझ्या सर्व वस्तु त्याच्या घरी आहेत. तसेच माझ्या मुलांचे कपडे, पुस्तकंदेखील तिथेच आहेत. ते माझं सासर आहे. मी जी पेंटिंग बनवली होती तेदेखील तिथेच आहे. माझं सर्व सामान त्या घरात आहे. पण ते माझं घर नाही असं माझे पती म्हणत आहेत. ते घर माझं नाही आहे? ते माझे पती नाही आहे? आमचं लग्न झालं नाहीये का?”, याव्यतिरीक्त इंस्टाग्राम स्टोरीवरदेखील पोस्ट केली होती ज्यामध्ये लग्नाबद्दल तिने पोस्ट केली होती.
दरम्यान तिने आता केलेली पोस्ट डिलिट का केली? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काही नेटकरी म्हणाले की बरं झालं पोस्ट डिलिट केले ते. तसकह नेटकरी तिला दिलासादेखील देत आहेत. शनिवारी दलजितने सोशल मीडियावर स्टोरी करत वेगळे होणार असण्यावर शिक्कामोर्तब केला. तसेच काही महिन्यांपूर्वी तिने व तिच्या पतीने एकमेकांना अनफॉलोदेखील केले.
आणखी वाचा – KKRचा विजय होताच शाहरुख खानने आनंदाच्या भरात बायकोला किस केलं अन्…; भलताच भारावून गेला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल
दलजित व निखिल एकमेकांबरोबर २०२३ साली लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर ती भारत सोडून केन्याला शिफ्ट झाली. तिने सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर केले आहेत. पण नंतर काही माहिन्यातच ती भारतात पुन्हा आली. तिने निखिल आधी अभिनेता शालीन भानोतबरोबर लग्न केले होते. शालीनवर तिने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.