बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई कधीच झाले नाही कारण…”, विवाहित पुरुषाशी लग्न, कधीही बाळ न होण्याबाबत अरुणा ईराणींचा खुलासा, म्हणालेल्या, “माझं दुःख…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Aruna Irani talked about her personal life see the details

"आई कधीच झाले नाही कारण...", विवाहित पुरुषाशी लग्न, कधीही बाळ न होण्याबाबत अरुणा ईराणींचा खुलासा, म्हणालेल्या, "माझं दुःख..."

मनोरंजन क्षेत्रामधील कलाकारांचे आयुष्य हे जितके ग्लॅमरस वाटते, तितकेच ते असतं असं नाही. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळेच चर्चेत राहत असतात. अशाच एक अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. बेटा, ‘फर्ज, रॉकी’, ‘बॉबी’ आणि ‘लव्ह स्टोरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अरुणा इराणी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहेत. त्यांनी आजवर ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या.

दिग्दर्शक कुकू कोहलीबरोबरच्या त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा रंगली होती. त्यांनी अनेक दिवस त्यांचे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते. याशिवाय त्यांनी कधीही आई न होण्याचाही निर्णय घेतला होता. अशातच त्यांनी एका मुलाखतीत त्यांचे लग्न लपवून ठेवण्याबद्दल व मुल न होण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की, “मी एका विवाहित पुरुषाशी लग्न केल्याचे कोणालाही माहीत नव्हते. त्याच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी काही आजाराने निधन झाले होते असून मी याबद्दल पहिल्यांदाच बोलत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

आणखी वाचा – ‘पंचायत’ ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, या आठडव्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी चित्रपट व सीरिजचा खजिना, वाचा संपूर्ण यादी

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला माहित नाही की, मला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल माहीत नव्हते ही बातमी का पसरवली गेली? त्यांची पत्नी मुलांसह सेटवर येत असे. पण लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता. या स्त्रिया नेहमी इतर महिला त्यांच्यावर आरोप करतात. पण मी याला जबाबदार नाही, तिचा नवरा आहे. आधी त्याला थांबवा, त्याने असे का केले? याबद्दल त्याला विचारा. मी कुणाचेही घर फोडले नाही. एखाद्या नात्यात तिसरी व्यक्ती कशी येते? याबद्दल त्या माणसाला किंवा स्त्रीलाच माहिती असते”.

आणखी वाचा – “बेडरुममध्ये मुलासह मला वडिलांनी पकडलं अन्…”, जान्हवी कपूरचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “वडील आले तेव्हा…”

यापुढे अरुणा इराणी यांनी मुले न करण्याच्या निर्णयावर त्यांचं मत व्यक्त करताना असं म्हटलं की, “विवाहित पुरुषाशी लग्न करणे सोपे नाही. यामुळे मी कधीच आई झाले नाही आणि हे दु:ख मी सहन करत आहे. मी त्या वेदना झेलत आहे. मला काळजी वाटते हे ठीक आहे, पण माझ्या मुलाने पुढे जाऊन वडील कुठे आहेत? असे विचारले, तर मी त्याला काय उत्तर देऊ? ते (कुकू कोहली) हेही फसतील. समजा माझ्या मुलाला मध्यरात्री काही झाले तर मी कॉल करू शकत नाही. म्हणूनच मला मूल व्हावं असं कधीच वाटले नाही आणि हे दुःख मी माझ्या मुलाला देणार नाही”.

Tags: aruna iranibollywood actressBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Appi Aamchi Collector audience expressed their displeasurement through comments on the current storyline of the serial

“रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची...’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.