टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. अंकिताने आजवर अनेक मालिका तसेच हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावकर’ या चित्रपटामध्ये ती शेवटची दिसून आली होती. यामध्ये ती अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर दिसून आली होती. ती नेहमी तिचा पती विकी जैनबरोबर दिसून येते. काही दिवसांपूर्वी तिचे व विकीचे काही फोटो समोर आले होते. यामध्ये अंकिता पारंपरिक वेशात दिसून आली होती. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच विकीदेखील धोतर नेसलेला दिसून आला. दोघंही जैन विधी करताना दिसत होते. अशातच आता अंकिता व विकी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (ankita lokhande on vicky jain)
अंकिताने विकीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने विकीची मस्करी केली आहे. अंकिताने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये पूजा करताना दिसत आहे. तिच्याबरोबर विकीदेखील दिसून येत आहे. यामध्ये विकीचे डोळे बंद असलेले दिसून येत आहेत. तसेच तिने ‘जागो विकी’ असे विनोदी कॅप्शनदेखील दिले आहे.
तसेच अंकिताने काही दिवसांपूर्वी काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये अंकिता सुंदर अशी साडी नेसली आहे. तसेच तिचे केसदेखील कुरळे दिसून येत आहेत. तिच्या या लूकला चाहत्यांनी खूप पसंतीदेखील दर्शवली होती. दरम्यान आता अंकिता व विकी ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमामध्ये दिसून आले होते. यामध्ये त्यांनी जेवण बनवण्याबरोबरच खूप धमालदेखील केली होती. याचवेळी अली गोनीच्या एका वाक्यामुळे अंकिता गरोदर असल्याच्याही चर्चा सुरु होत्या. मात्र या अफवा असल्याचे सांगण्यात आले होते.
अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर अंकिता लोखंडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी अशी कमाई करण्यात अपयशी ठरला. याशिवाय ती तिचा पती विकीबरोबर ‘ला पिला दे’ म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.