Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे दिवाळी सणानिमित्त सुभेदार कुटुंबात आनंद पाहायला मिळत असतो. सगळेजण दिवाळीची जय्यत तयारी करताना दिसतात. त्या किल्लेदार कुटुंबातही रविराज, प्रतिमा यंदाची दिवाळी प्रतिमा असल्याने जोरदार साजरी करायचं ठरवतात. कल्पना सायलीच्या मदतीने फराळाचा चांगला घाट घालते. सगळेच जण खूप आनंदी असतात. लक्ष्मीपूजनादिवशी अर्जुन महत्त्वाचं काम आहे सांगून घराबाहेर पडतो. तर बराच वेळ अर्जुन घरी परतला नसल्याने सायली काळजी व्यक्त करु लागते. ती कल्पनालाही अर्जुन कुठे गेला आहे याबाबत विचारते मात्र तिलाही काहीच माहित नसल्याचं ती सांगते.
त्याच वेळेला अर्जुन एका अशा व्यक्तीला घरात घेऊन येतो ज्याने सायलीचे डोळे पाणावतात. मधु भाऊंना समोर पाहून सायलीला फारच आनंद होतो. थेट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मधु भाऊंना जेलमधून सुटलेलं पाहून सायली खूप खुश होते. ती त्यांना जाऊन घट्ट अशी मिठी मारते. अखेर अर्जुनने सायलीसाठी काहीपण असं म्हणत मधु भाऊंची जेलमधून सुटका केली असल्याचे पाहायला मिळतंय. सायलीने अर्जुनवर दाखवलेला अविश्वास हा खोटा असल्याचं अर्जुनने सिद्ध करुन दाखवलेलं पाहायला मिळतंय.
मालिकेच्या भागात असं पाहायला मिळते की, मधुभाऊ जेलमधून सुटून आले आहेत, यावर सायलीचा विश्वास बसत नाही. मी परत न जाण्यासाठी आलोय आणि जावईबापूंनी मला बेलवर सोडवलंय, असं मधुभाऊ सायलीला म्हणतात. माझ्याकडून जी चूक घडली होती ती सुधारावी लागणारच होती ना मला, असं अर्जुन सायलीला सांगतो. यावेळी मधुभाऊ सायलीला म्हणतात, ‘तुझ्यापाठीशी तुझा नवरा असताना, कशाला घाबरायचं’. बाप-लेकीची भेट दिवाळीच्या दिवशी व्हावी हीच देवी आईची इच्छा होती, असं कल्पना म्हणते.
यानंतर अर्जुन सायलील म्हणतो, ‘मी तुम्हाला वाटतो इतका वाईट नाहीये’, असं अर्जुन सायलीला सांगतो आणि कान पकडून तिची माफी मागतो. यानंतर सायली, अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि रडते. आता सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम फुलणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.