‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून गायक प्रथमेश लघाटे घराघरांत पोहोचला. प्रथमेशने आजवर त्याच्या सुमधुर गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्रथमेश नेहमीच गायनसेवा करण्यात मग्न असतो. बरेचदा तो गायनसेवेसाठी अनेक ठिकाणी दौरेही करताना दिसला आहे. प्रथमेश विशेष चर्चेत आला तो त्याच्या लग्नामुळे. प्रथमेशने गायिका मुग्धा वैशंपायनसह लग्नगाठ बांधली आहे. काही महिन्यांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकली. प्रथमेश व मुग्धाच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली. (Prathamesh Laghate Konkan Trip)
‘आमचं ठरलं’ म्हणत प्रथमेश व मुग्धाने सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून दोघांच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. त्यानंतर अखेर दोघांनी शाही विवाहसोहळा करत लग्न केले. डेस्टिनेशन वेडिंग करत कुटुंबीय, नातेवाईक व कलाक्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी भव्य लग्नसोहळा आटोपला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या गायनाने आजवर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरुन मुग्धा-प्रथमेश नेहमीच त्यांच्या कामाचे अपडेट देत असतात. सध्या मुग्धा ही गायनसेवेसाठी अंदमान दौरा करताना दिसत आहे. तर प्रथमेश सध्या कामातून ब्रेक घेत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावरुन त्याने त्याच्या कोकणातील आजोळचे अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. चिपळूण हे त्याचे गाव आहे. सध्या प्रथमेश त्याच्या आजोळी म्हणजेच त्याच्या आईच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे.
कोकणात फिरतानाचे अनेक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. कोकणातील आजोळीच्या घरी गेल्यानंतर प्रथमेश तिथल्या शेतीत फिरताना दिसला. शेतातील काही खास फोटो त्याने शेअर केले आहेत. शिवाय कोकणची खासियत असलेले ओले काजूगर फोडतानाचेही त्याने फोटो शेअर केले आहेत. निसर्गरम्य अशा कोकणची सफर त्याने फोटोंमधून घडविली आहे. दरम्यान, मुग्धा अंदमान येथे गायनसेवेसाठी गेली असल्याने तिला प्रथमेशसह कोकणात जाता आलेले नाही.