‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवी या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. या जान्हवी भूमिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मनमोहक, तेजस्वी, लाघवी आणि मनमेळाऊ अशा तेजश्रीन रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. (tejashree pradhan new thought)
‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवी या पात्रामुळे ओळखली जाणारी सुनबाई संपूर्ण महाराष्ट्राची सुनबाई झाली होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्राची तर त्या दिवसांत फॅशनच आली होती. जान्हवी मंगळसूत्र या नावाने ते मंगळसूत्र फेमस होत आणि कित्येक महिलांनी त्या मंगळसूत्राचं कौतुकही केलं होत. याशिवाय तेजश्री ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतही पाहायला मिळाली. या मालिकेतही तिच्या उठावदार भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला.
पहा तेजश्रीची आकर्षक पोस्ट – (tejashree pradhan new thought)
तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती नेहमीच आशयघन कॅप्शन, मनमोहक फोटो आणि काही प्रोत्साहित करणारे व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तेजश्रीला सोशल मीडियावर सपोर्ट करताना दिसतात. अशातच तेजश्रीने पोस्ट केलेल्या आणखी एका फोटोने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलंय. या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची अधिक चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. तेजश्रीने शेअर केलेला तेजस्वी फोटो आणि आकर्षक असे कॅप्शन चाहत्यांना भुरळ घालत आहे. तिच्या स्मितहास्याने तर चारचाँदच लावलेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.(tejashree pradhan new thought)

तेजश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या गोड फोटोसह “हॅलो, एखाद्यासारखं सुंदर होण्याचा प्रयत्न करु नका. त्यापेक्षा तुम्ही स्वत:सारखे सुंदर बना!! #सुखी जीवन”, असे कॅप्शन देत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी हार्ट ईमोजी पाठवला आहे.
====
हे देखील वाचा – ३ मुलांनंतर दुसरं लग्न?,मालिकेच्या कथेवर होणाऱ्या टीकेला अरुंधतीचं प्रतिउत्तर
====
तेजश्रीने नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. याशिवाय हिंदी सिनेविश्वातही तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेनंतर तेजश्रीने ठरवून ब्रेक घेतला असल्याचं एका मुलाखतीदरम्यान सांगितलेलं ऐकण्यात होत. मालिकाविश्वातील ही लोकप्रिय अभिनेत्री छोट्या पडद्यापासून दूर राहिली त्यामुळे प्रेक्षकांनीही नाराजगी दर्शिविली होती. आता तेजश्री पुन्हा कधी परतणार याकडे सिनेरसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.(tejashree pradhan new thought)