मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकारला ओळखलं जात, जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे. यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले .तिच्या कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली.. या गाण्याची भुरळ सगळ्यांना पडली.या गाण्यावर आजवर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनेत्रीसोबतच दिग्दर्शिका म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.काकण या चित्रपटाचं दिग्दर्शनही क्रांतीने केले होते.शहाणपण देग देवा, फक्त लढ म्हणा, खो-खो, रॉकी अशा अनेक चित्रपटात क्रांतीने काम केले आहे.सध्या क्रांती ही मोठ्या पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तर अश्यातच तिने धक्कादायक माहिती दिली आहे.(Kranti Redkar)

क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर नेहमी तिच्या आयुष्यातील काही प्रसंग शेअर करत असते. अश्यातच तिने एक व्हिडीओ शेअर करत तिने तिचे एका दिवशी चार ऑपरेशन झाले, आणि का झाले याचा खुलासा केला.
क्रांतीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय.या व्हिडिओत क्रांतीच्या डोक्यावर बँडेज पट्ट्या आणि तिचा गंभीर चेहरा दिसत आहे. हे पाहून अनेक चाहते घाबरले असून नक्की तुला काय झालं? असं विचारलं.ऑपरेशन डॉक्टर असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत ती म्हणतेय घरी डॉ. सेट आलेला आहे.आणि सकाळपासून माझ्यावर ४ ऑपरेशन झाली आहेत. मायक्रोस्कोपनं पेशंटला पाणी पाजलं जात आहे.असं सगळं चालू आहे. दोघींची तब्येत बरी नव्हती.म्हणून त्यांना डोकोर सेट घेऊन दिला, तर हे सगळं” तर अश्या गमतीशीर पद्धतीने ती मुलींची धम्माल मस्ती सांगते(Kranti Redkar)
====
हे देखील वाचा- “सर्व भावनांचा कोलाज…” समीरची सचिन गोस्वामींसाठी खास पोस्ट
====
झिया आणि झायदा या तिच्या जुळ्या मुली आहेत.क्रांती नेहमी मुलींसोबतचे धम्माल मस्ती करत असते. तर नुकतंच शेअर केलेला ऑपरेशनचा व्हिडीओ हा देखील एक मजेशीर व्हिडीओ आहे. तर हा व्हिडीओ पाहून टाके सॉलिड घातलेत.अजून बरेच तोर्रेशन बाकी म्हणजे अश्या अनेक कमेंटस केल्या आहेत, तर काही चाहत्यांना हसू आवरत नसून अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर हास्याचा पाऊस
पाडलाय.
काकण सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तिचा हा दुसरा चित्रपट असून याची शूटिंग लंडनमध्ये होत आहे. याचे बरेच bts व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत.या सिनेमात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(Kranti Redkar)