अनेक हिंदी मराठी चित्रपट आपापल्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांचा वापर करत असतात . हिंदी चित्रपट प्रामुख्याने कॉमेडी नाईट्स विथ कपिल तर मराठी चित्रपट, नाटक, मालिका या प्रमोशन साठी चला हवा येउद्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा मार्ग निवडतात. अशातच सध्या चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम चर्चेत ठरतोय. नुकताच प्रदर्शित झालेला पण स्क्रीन्स न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत न पोहचेलला चित्रपट TDM हा एक मोठा मुद्दा ठरला आहे.(Chala Hawa Yeu Dya Controversy)
TDM चित्रपटाचे दिगदर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी एका मुलाखतीत एक खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले ख्वाडा चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मला या कार्यक्रमात बोलवण्यात आले होते त्यामुळे त्याचित्रपटाचं चांगलं प्रमोशन देखील झालं. पण नंतर बबन सोबत असं झाली नाही तर TDM साठी मी त्यांना संधी मागितली तर मला आम्ही आधीच एक चित्रपट या आठवड्यात करतोय असं सांगून मला टाळण्यात आलं. त्यावर भाऊराव यांनी आधीच्या किंवा नंतरच्या आठवड्यात प्रमोशनची संधी मागितली तेव्हा सुद्दा त्यांना योग्य सहकार्य मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा – पुन्हा एकदा मामांचा मिश्किल लुक, प्रेक्षकांना आठवला मामांचा जुना अंदाज
या आधी भाऊराव कऱ्हाडे आणि कलाकारांचा एक भावुक व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत ठरला होता. TDM चित्रपटाचे दिगदर्शक भाऊराव कऱ्हाडे त्यावेळी स्पष्ट शब्दात म्हणाले की, ‘आज ‘टीडीएम’ चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे.(Chala Hawa Yeu Dya Controversy)