बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जे त्यांच्या मुलांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अभिनेत्री क्रांती रेडकर, नम्रता संभेराव, अभिजीत केळकर, धनश्री काडगांवकर यांसारखे अनेक कलाकार कायमच आपल्या मुलांचे अनेक व्हिडीओ, रील्स सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. शुटींगदरम्यान कितीही व्यस्त असले तरी ही कलाकार मंडळी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवून असतात. शेवटी आई बापाचं काळीज असल्याने त्यांची ओढ अर्थात त्यांच्या मुलांकडे असणं साहजिकच आहे. (Dhanashri Kadgaonkar On Her Son)
अभिनेत्री धनश्री काडगांवकर ही तिच्या लेकाला पुण्यात ठेवून शूटिंगसाठी मुंबईत असते. अशातच अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने शेअर केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. धनश्रीने आजवर नेहमीच तिच्या लेकासोबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. असाच एक लेकासोबत व पतीसोबतचा मज्जा मस्ती करतानाच एक खास व्हिडीओ धनश्रीने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये धनश्रीचे पती तिचे खांदे चेपून देताना दिसतायत, तर धनश्रीचा लेक कबीर हा त्याच्या वडिलांचे खांदे चेपून देतोय. आनंदी अशा कुटुंबाचा हा लेकासोबत मज्जा मस्ती करतानाच व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या व्हिडिओमध्ये कबीरची आई वडिलांसोबतची मस्ती ही पाहायला मिळतेय.
धनश्री सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पी हे पात्र साकारतेय. खलनायिकेच्या भुमीकेत धनश्रीला पाहणं रंजक ठरतंय. लेकाला पुण्यात सोडून मुंबईत शूटिंगसाठी ती कायमच येते. ‘तू चाल पुढं’ मालिकेतील शिल्पी हे पात्र आता घराघरांत पोहोचलं आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडिओमध्ये तिचा लेक कबीर धनश्रीला तिच्या मालिकेतील शिल्पी या नावाने हाक मारताना पाहायला मिळाला. कबीरच्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती देखील दर्शविली होती.

धनश्री व तिचा लेक कबीरचं बॉण्डिंग नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतं. लेकासोबतचे अनेक व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते सोबतच ती मालिकेच्या सेटवरील मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.