‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाचा पहिला भाग विशेष रंगला. बरं या कार्यक्रमाच्या पहिल्या भागातील बरेच स्पर्धक आज नावाजलेल्या कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड ही शोच्या माध्यमातून नावारुपाला आली. आजही कार्तिकीने तिच्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांच्या मनात तीच स्थान कायम ठेवलं आहे. कार्तिकीने या कार्यक्रमादरम्यान व कार्यक्रमानंतर गायलेल्या गाण्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कार्तिकीच्या आजवरच्या यशात तिच्या आई वडिलांनी कायमच पाठिंबा दिला. (Kartiki Gaikwad Shares Goodnews)
कार्तिकी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. तीच लग्न, तिचा परदेश दौरा हे चर्चेत होतच, आता या नंतर कार्तिकीने आणखी एक गुडन्यूज देत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने एक आनंदाची बातमी शेअर केली. ‘नवीन फॅमिली मेंबर’ असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे.
पाहा कार्तिकीच्या नव्या कारची किंमत किती आहे (Kartiki Gaikwad Shares Goodnews)
कार्तिकी कायमच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिचा पती रोनित पिसे सोबत काही दिवसांपूर्वी बाली येथे फिरायला गेली होती. तेथील त्यांच्या रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. यानंतर कार्तिकीची एक खास पोस्ट चर्चेत आली आहे. कुटुंबासोबतचा एक व्हिडीओ शेअर करत तिने गुडन्यूज दिली आहे. या व्हिडिओत कार्तिकीचा नवरा, आई-वडील, भावंड यांच्यासह कुटुंबातील इतरही सदस्य या व्हिडिओत दिसत आहेत. गायकवाड कुटुंबियांनी गाडी घेतल्याची खास बातमी देणारा हा व्हिडीओ आहे.
कार्तिकीच्या कुटुंबाने फॉर्च्युनर गाडी खरेदी केली आहे. ‘कुटुंबातील नवीन सदस्य फॉर्च्युनर’ असं कॅप्शन देत कार्तिकीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कार्तिकीचा भाऊ गाडीची पूजा करताना दिसत आहे. त्यानंतर घरी गाडी घेऊन आल्यानंतर ते गाडीची आरतीही करताना दिसत आहे. कार्तिकीने फॉर्च्युनर ही गाडी खरेदी केली असून या गाडीची किंमत साधारण ३३ ते ५० लाखांच्या आसपास आहे.

हे देखील वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम झाले आजोबा, लेकीने दिला गोंडस मुलाला जन्म
कार्तिकीने शेअर केलेल्या या आनंदाच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तसेच चाहत्यांनीही कमेंट करत कार्तिकीला व तिच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.