कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करतात. पण काही कलाकार मंडळी अभिनयासोबत , त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील किस्से चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असतात. ‘बिग बॉस’ फेम अभिजित केळकर सोशल मीडियावर सक्रिय असतो. ‘बिग बॉस’ मध्ये असताना देखील अभिजित स्वतःची कामं स्वतः करताना पाहायला मिळाला. स्वतःची कामं स्वतःला करता यावी यासाठी आतापासूनच अभिजित मुलांना धडे देताना पाहायला मिळतोय. (Abhijeet kelkar post)
मराठी अभिनेता अभिजीत केळकर गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिजीतचा लहान मुलगा मल्हारचा स्वयंपाक शिकतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मल्हार चपात्या लाटत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकार मंडळी आणि नेटकऱ्यांनी मल्हारचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा:- “आपल्या कामाची दखल…”, ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘त्या’ व्यक्तीचं अभिषेक बच्चकडून कौतुक, म्हणाला, “तू हे…”
अभिजीत केळकरने या व्हिडीओला “खरे संस्कार मुलांवर (पुरुषांवर) करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनचं व्हायला हवी” असे सुंदर कॅप्शन देत समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींप्रमाणे मुलांनाही घरची विशेषत: स्वयंपाक घरातील सर्व कामं आली पाहिजेत असे अभिनेत्याला या व्हिडीओद्वारे सूचित करायचे आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत अभिजीतसह त्याच्या लहान मुलाचे कौतुक केले आहे.