Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बातम्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. या शोमधील अनेक कलाकारांनी हा शो सोडला आणि मालिकेच्या प्रॉडक्शनवर गंभीर आरोप केले. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोच्या निर्मात्यांविरूद्ध अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्यातील हा वाद नेहमीच चर्चेत राहिला. हा शो सोडल्यानंतर अभिनेत्रीने मालिकेबाबतचे अनेक खुलासे केले. या शोमध्ये मालिकेतील लहान मुलांबरोबर त्यांची वागणूक कशी होती याबाबतचा खुलासा जेनिफरने केला आहे. अभिनेत्रीने केलेल्या या खुलासाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘बॉलिवूड बबल’शी झालेल्या संभाषणात जेनिफर म्हणाली की, “सर्व लहानग्यांना महत्त्वाचा प्रॉब्लेम हा अभ्यासाचा होता. कधीकधी मुले खूप अस्वस्थ व्हायची. मुलांच्या परीक्षा आल्या म्हणजे रात्रीचं शूट लागलं आणि हे समीकरणच झालं होतं. आता रात्रीच्या शूटमध्ये ते शूट करुन अभ्यास देखील करीत असत. सकाळी ७ वाजता त्यांच्या परीक्षा असायच्या. सेटवरुन त्यांना ६ वाजता सोडलं जायचं जिथून ते सरळ परीक्षेला जायचे. अशा हेक्टिक श्येड्युलमध्ये ती मुलं कशा परीक्षा देत असतील याचा विचारही करवत नाही. मुलांनी खूप त्याग केला आहे. पण त्या वागणुकीची त्यांना सवय झाली होती आणि त्यात ते खुश होते”.
या शोमध्ये, भव्य गांधी, झील मेहता, समय शाह,अजहर शेख आणि कुश शाह हे मुलांच्या पात्रांमध्ये दिसले. आता जवळजवळ या सर्व कलाकारांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या समय शाह आणि अजहर शेख शोमध्ये दिसत आहेत. या दिवसात चालू असलेल्या ट्रॅकबद्दल बोलताना, शोमध्ये सोनू भिडे हिच्या लग्नाचा ट्रॅक चालू आहे. सोनूचे लग्न होणार आहे. हे जाणून संपूर्ण टपू सेना खूप अस्वस्थ आहे. सोनूच्या लग्नाबद्दल स्वतः सोनू आणि टपू सेना तणावात आहे.
आणखी वाचा – गुप्तांगाच्या चिंध्या, शरीरभर चावलास, तू बरोबरच केलंस कारण…
सोनू स्वत: या नात्याने आनंदी नाही. पण वडील आत्माराम भिडे यांच्या सक्तीने हे लग्न होत आहे. आता येत्या काही दिवसांत हे पाहणं रंजक ठरेल की खरंच सोनूचे लग्न होणार का?, वा टपू सेना त्यांच्या युक्तीने हे लग्न होण्यापासून सोनूला वाचवतील.