तुझी नजर तिच्यावर पडली. त्याचक्षणी तुझ्या शारीरिक भावना उत्तेजीत झाल्या. दरम्यान तू केलंस काय तर त्या निरागस जीवाला आमिष दाखवलंस. पाच वर्षांची ती तुझ्या जाळ्यात फसली. नाही, तू बरोबरच केलंस. कारण तुझं शारीरिक सुख अधिक महत्त्वाचं होतं. तुझ्या आमिषाला ती बळी पडली आणि तू अर्धा डाव तिथेच जिंकलास. तुझ्यामधल्या पुरुषी भावना आणखी प्रोत्साहित झाल्या. तो फक्त निष्पाप जीव याचाही तुला विसर पडला. अरे तो विसर पडणारच होता. कारण तुझं पुरुषत्व दाखवण्याची हीच तर योग्य वेळी होती. तुझा तुझ्या शरीरावरचा ताबा सुटला अन् खेळ सुरु झाला तो राक्षसाचा… (Gwalior rape Case)
दारु प्यायल्यानंतर तुला थोडंही थांबवलं नाही. मग तू केलंस काय तर तिला घराशेजारच्याच एका परिसरातील बंद घरात घेऊन गेलास. पुढील काही क्षणांमध्ये तिचं आयुष्यच तू बदलून टाकलंस. अरे हो हे तर मी विसरलेच, तिचं आयुष्य घडवायची जबाबदारी तुझ्यावरच होती नाही का?. इतका पेटून उठलास की, तिचे दोन्ही पाय ताणून तू वेगळे करण्याचा प्रयत्न केलास. गाल, ओठ आणि कुठे कुठे जागा मिळेल तिथे चावलास. डॉक्टर म्हणाले गुप्तांगाला आम्हाला २८ टाके मारावे लागले. म्हणजे तिला शारीरिक दृष्ट्या मजबूत करण्याची जबाबदारीही तू उत्तमरित्या पार पाडलीस.
इतकं सगळं करुन तुझं मन भरलं नाही म्हणून तू डोकं भिंतीला आपटून जीवे मारण्याचा निश्चय केलास. तुझ्या सगळ्या शारीरिक गरजा संपल्या, तिच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या केल्यास तेव्हा कुठे तुझ्या पुरुषत्वाचा विजय झाला. मग काय भानावार आलास आणि तसाच तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेलास. चुकलं तुझं कुठे रे कारण तिच्या मरणाची जबाबदारीही तूच तर घेतली होतीस. हे सगळं सगळं केलंस ते बरोबरच केलंस. कारण तुला आयुष्यभर कधीच चांगल्या पद्धतीने शरीरसुख मिळालं नसतं बरोबर ना…
आणखी वाचा – शिवशाहीत ‘ती’ फसली, अत्याचार सहन करुनही दोष तिलाच का?
भावना उत्तेजीत झाल्यानंतर आपल्या शरीरावर ताबा ठेवणं तुला जमलं नाही ही तुझी चूक नाहीच. असं विकृतीचं कृत्य करणाऱ्यांन विरोधात कठोर कायदा न बनवणाऱ्यांची ही चूक आहे. जागीच अशा नराधमांना फाशी न देणाऱ्यांची ही चूक… तुला फासावर चढवण्यासाठी तिचे कुटुंबीय झटतायत. पण असं होणं शक्य आहे तरी का?. जर याही प्रश्नाचं उत्तर नाहीच आलं, तर मग हीसुद्धा तुझी नव्हे तर देशात कायदा-सुव्यवस्था चालवणाऱ्यांची चूक…
मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये ही घटना घडल्यानंतर तिथल्या राजकीय मंडळींनी तात्पुरता संतापलेल्या वातावरणात हात धुवून घेतले. पण पुढे काय झालं तर परिस्थिती जैसे थे… मग आता मला सांगा या संपूर्ण प्रकाराला आणि चिमुरडीच्या अत्याचाराला ही मंडळीही तितकीच जबाबदार आहेत असं आपण का म्हणू नये?. घटना घडून गेल्यानंतर मतं मांडण्यापेक्षा पुन्हा असं कृत्य होणार नाही म्हणून कठोर निर्णय घ्यायला नको का?. बरं या चिमुरडीसाठी ना कुठे मोर्चे निघाले ना कोणता कँडल मार्च. ती बिचारी एकटीच आगीत होरपळून निघाली… पुन्हा हा आरोपी मोकाट सुटला, प्रकरण दाबलं तर मग सांगा बरं यात चूक नक्की कोणाची?