गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : विमान प्रवासा दरम्यान झालेल्या गैरसोयीवर भडकला सिद्धार्थ जाधव, राग व्यक्त करत म्हणाला, “माझ्या बॅगेचं हँडल…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 14, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth Jadhav Angry

Siddharth Jadhav Angry

अनेक कलाकार आपल्या रोजच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. कधी ट्रेन, बस तर कधी विमान या मार्गांनी कलाकारांचा हा प्रवास सुरु असतो. मात्र बऱ्याचदा सामान्य माणसांप्रमाणेच कलाकारांनाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सध्या अशाच एका समस्येला सामोरं जावं लागलाय अभिनेता सिद्धार्थ जाधवला. विमानप्रवास दरम्यान झालेल्या गैरसोईबाबत एक व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ राग व्यक्त केला आहे. सिद्धार्थ एका कामा निमित्त मुंबई ते गोवा विमानाने प्रवास करुन गेला त्या दरम्यान त्याच्या वस्तूंची योग्य ती निगा न राखल्याची तक्रार त्याने स्टोरी पोस्ट करत केली आहे. (Siddharth Jadhav Angry)

सिद्धार्थ ने पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये इंडिगो एरलाईन्स यांना टॅग करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थची बॅग फाटलेल्या अवस्थेत दिसत आहे तर सिद्धार्थने याबाबत इंडिगो एरलाईन्सची चांगलीच कानउघडणी केली आहे. सिद्धार्थ व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता नुकताच इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो. तुम्ही स्वत:च बघा त्यांनी माझ्या बॅगेची कशी काळजी घेतली आहे. या लोकांनी फक्त माझ्या बॅगेचं हँडलच नीट ठेवलंय. बाकी तुम्हीच माझी संपूर्ण बॅग बघा. इंडिगो तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सामानाची काळजी घेतलीये हे पाहून मला छान वाटलं.” उपहासात्मक बोलण्यातून सिद्धार्थने झालेल्या नुकसानाबद्दल एरलाईन्स टीमचे कान टोचले.

Thnx @IndiGo6E pic.twitter.com/ZHqR41EcRO

— SIDDHARTH JADHAV ???????? (@SIDDHARTH23OCT) March 13, 2024

आणखी वाचा- ‘तारक मेहता….’ फेम टप्पू-बबिताच्या साखरपुड्याबद्दल स्वतः अभिनेत्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “त्या बातम्या…”

सिद्धार्थप्रमाणेच अनेक कलाकारांनी देखील अशा प्रकारच्या तक्रारी करत झालेल्या प्रकाराबद्दल माहिती प्रेक्षकांना दिली आहे. आता याबाबत इंडिगो एरलाईन्स काय पाऊलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सिद्धार्थने त्याच्या स्टोरीसह, ट्विटर (एक्स) वर देखील या व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थने पोस्ट केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. (Siddharth Jadhav Angry)

आणखी वाचा- ‘सीता और गीता’मधील चाची मनोरमाची शेवटच्या दिवसांमध्ये झालेली विचित्र अवस्था, चेहरा बदलला, आजाराने मृत्यूला कवटाळलं अन्…

सिद्धार्थने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील सिद्धार्थने चांगला लौकिक मिळवला. तसेच सिद्धार्थ सध्या चर्चेत आहे ते म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरीवल लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमातील त्याच्या निवेदकाच्या भूमिकेसाठी. त्यासह सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला लग्नकल्लोळ हा चित्रपट देखील नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Tags: entertainmententertainment newssiddharth jadhav
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Satish Rajwade Business Head of star pravah channel comment on the trolling of Aai kuthe kay karte serial see the details

'आई कुठे...' ट्रोल होऊनही सुरुच राहणार, चॅनलच्या बिजनेस हेडचं मोठं वक्तव्य, म्हणाले, "मालिका डोक्यावर घेतात आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.