शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानची ऑनस्क्रीन आई सध्या करते तरी काय?, सतत ५० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुठे गायब झाली ‘ही’ अभिनेत्री?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress Farida Jalal

शाहरुख खानची ऑनस्क्रीन आई सध्या करते तरी काय?, सतत ५० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुठे गायब झाली ‘ही’ अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपत्रसृष्टीमध्ये राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे फरीदा जलाल. फरीदा जलाल यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १४ मार्च १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या आता ७४ वर्षांच्या आहेत. अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, आई अशा अनेक भूमिकांमध्ये त्या दिसल्या आहेत. पण गेल्या काही काळापासून त्या चित्रपटसृष्टीपासून लांब असलेल्या पाहायला मिळत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया. (actress Farida Jalal)

फिल्मफेअरच्या ‘युनायटेड फिल्म प्रोड्यूसर्स टॅलेंट हंट’ या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याबरोबर दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांनीही सहभाग घेतला होता. पुरुषांमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता तर महिलांमध्ये फरीदा पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांना ताराचंद बडजात्या यांची ‘तकदीर’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर दिलीप कुमार, राजेश खन्ना यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना राजेश खन्ना यांच्याबरोबर ‘आराधना’ या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये त्यांनी राजेश खन्ना यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा – ‘तारक मेहता….’ फेम टप्पू-बबिताच्या साखरपुड्याबद्दल स्वतः अभिनेत्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “त्या बातम्या…”

अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्री, सह-अभिनेत्री व आई या भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १९९२ पासून त्यांनी आई ही पात्र साकारण्यास सुरवात केली. ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका केली आहे. कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘डुप्लीकेट’, ‘दिल तो पागल है’ अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये त्यांनी शाहरुख खानच्या आई किंवा सासूची भूमिका केली आहे.या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.

आणखी वाचा – Video : विमान प्रवासा दरम्यान झालेल्या गैरसोयीवर भडकला सिद्धार्थ जाधव, राग व्यक्त करत म्हणाला, “माझ्या बॅगेचं हँडल…”

फरीदा यांना ‘मम्मो’या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर २००३ पासून त्यांनी लहन पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. ‘शरारत’ या मालिकेमध्ये त्या मुख्य भूमिकेमध्ये दिसून आल्या. त्यानंतर २००८ मध्ये पंजाबी चित्रपट ‘यारिया’मध्येही काम केले आहे. प्रसिद्ध मालिका ‘बालिका वधू’ या मालिकेतही त्या दिसून आल्या होत्या.

१९७८ मध्ये त्यांनी तबरेज बरमवार यांच्याबरोबर लग्न केले. पण २००३ साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना यासीन नावाचा मुलगा आहे.

Tags: actress farida jalalbollywood actressbollywood gossipFarida jalalhindi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bhau Kadam Family Time

'चला हवा येऊ द्या' संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.